IPL 2026 RCB vs LSG Rishabh Pant Retired Hurt Due To Injury : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौ सुपर जाएंट्सची सुरुवात खराब झाली. एडन मार्करमच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर रिषभ पंत मैदानात उतरला. पण जोश हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर दुखापत झाल्यामुळे वेदनेनं व्याकूळ होऊन LSG च्या कर्णधारावर मैदान सोडण्याची वेळ आली. लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला हा एक मोठा धक्काच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं? त्याची दुखापत किती गंभीर?
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना धावफलकावर ३२ धावा असताना लखनौच्या संघाला पहिला धक्का बसला. एडन मार्करमची जागा घेण्यासाठी रिषभ पंत मैदानात उतरला. पाचव्या षटकात फक्त तीन चेंडू खेळवल्यावर त्याने वेदनेनं व्याकूळ होऊन खातेही न उघडता मैदान सोडलं. जोश हेजलवूडनं टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर रिषभ पंतने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू थेट त्याच्या डाव्या कोपरावर (left elbow) लागला. चेंडू लागल्यावर पंतला वेदना असह्य झाल्याचे पाहायला मिळाले. फिजिओ मैदान आले अन् त्याला पॅव्हेलियनच्या दिशेनं घेऊन गेले. आधीच आघाडीच्या फळीतील स्टार फलंदाज धावांसाठी संघर्ष करत आहेत. त्यात पंतला दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याची वेळ आली.
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
तो पुन्हा मैदानात उतरला, पण...
आयुष बडोनीच्या रुपात लखनौच्या संघाने ११८ धावांवर पाचवी विकेट गमावल्यावर रिषभ पंत पुन्हा मैदानात उतरला. पण तीन चेंडू खेळून एका धावेवर त्याच्यावर माघारी फिरण्याची वेळ आली. भुवनेश्वर कुमार याच्या गोलंदाजील फिल सॉल्टनं त्याचा अप्रतिम झेल टिपला. मिचेल मार्शची ३२ चेंडूतील ४० धावांच्या खेळीसह आयुष बडोनीनं २४ चेंडूत केलेल्या ३८ धावांशिवाय मुकूल चौधरीनं पुन्हा एकदा ३० प्लस खेळीसह संघाचा डाव सावरताना आपल्या फलंदाजीतील क्षमता दाखवली.