Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:48 IST2026-04-15T20:48:14+5:302026-04-15T20:48:38+5:30
पुणे शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे

Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
पुणे : पुणे शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने टँकर चालकांवर काही कठोर भूमिका घेतली आहे. त्याविरोधात टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या टँकर चालकांच्या संपासह काही तांत्रिक कारणांमुळे गुरुवार (दि. १६) रोजी पुणे महापालिकेने नियोजित पाणीपुरवठा बंद पुढे ढकलला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये प्रस्तावित बंदाच्या पुढील तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमित न होता अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.