प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:58 IST2026-04-15T18:58:10+5:302026-04-15T18:58:45+5:30

प्रशिक्षणादरम्यानसुद्धा आरोपी हिंदू देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणी करत होते. जेव्हा कर्मचारी अस्वस्थ व्हायचा, तेव्हा एचआर मॅनेजर निदा खान त्यांच्याशी संपर्क साधून हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Derogatory comments were made about Hindu deities during training; Big revelation in TCS case | प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक शाखेत धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक छळाच्या एका प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. कार्यालयात काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, पोलीस एचआर मॅनेजरच्या शोधात आहेत. एक विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. केवळ कर्मचारीच नव्हे, तर वरिष्ठ एचआर मॅनेजर्सचाही समावेश असलेले एक संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले आहे. आरोपींनी प्रशिक्षणादरम्यान हिंदू देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणीही केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह

आरोपी प्रशिक्षण पथकाचा भाग होते आणि त्यांच्याकडे नवीन कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती होती. ते आर्थिकदृष्ट्या दुर्बळ किंवा कौटुंबिक समस्या असलेल्यांना लक्ष्य करत होते. प्रशिक्षणादरम्यानही आरोपींनी हिंदू देवतांबद्दल अपमानकारक टिप्पणी केली होती असे समोर आले आहे. जेव्हा एखादा कर्मचारी नाराज व्हायचा, तेव्हा एचआर मॅनेजर निदा खान त्यांच्याशी संपर्क साधून हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करायची. यानंतर, त्या कर्मचाऱ्याला त्यांची जीवनशैली आणि पेहरावाच्या सवयी बदलण्यास सांगितले जायचे.

तरुणीने घरातील देवांचे फोटो काढून टाकले होते

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या निशाण्यावर असलेली ती कर्मचारी त्यांच्या प्रभावाखाली इतकी आली होती की, तिने घरातून हिंदू देवतांचे सर्व फोटो काढून टाकले, कुटुंबातील सदस्यांशी भांडण केले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींमध्ये शफी शेख, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी इत्यादींचा समावेश आहे. तपासादरम्यान, पोलिसांना एक व्हॉट्सॲप ग्रुप देखील सापडला, यामध्ये आरोपी त्यांच्या मिशनबाबत चर्चा करत होते. याशिवाय, लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांसाठी पैसे घेतले होते का, हे तपासण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, पोलिसांनी आठ महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले. तक्रारदारांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवर मानसिक आणि लैंगिक छळाचा, तसेच मानव संसाधन विभागावर त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सारी अशी आहेत, आणि महिला व्यवस्थापिका यांना हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर निलंबित करण्यात आले.

Web Title: Derogatory comments were made about Hindu deities during training; Big revelation in TCS case