धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: April 15, 2026 21:45 IST2026-04-15T21:44:48+5:302026-04-15T21:45:37+5:30

Udgir Body Massage Crime लातूरमध्ये मसाजच्या नावाखाली अंगावर नाचला! तरुणाचा मणका मोडला; उदगीरमध्ये गुन्हा दाखल

Shocking! Danced on body in the name of 'body massage'; Young man's spine dislocated in Latur, case registered against one | धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल

धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल

उदगीर (जि. लातूर): मसाज करून शरीराचा थकवा दूर करण्याच्या नादात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची संतापजनक घटना उदगीरमध्ये घडली आहे. मसाज करणाऱ्या व्यक्तीने अंगावर जोरजोरात नाचल्यामुळे फिर्यादीच्या पाठीचा मणका सरकला असून मणक्यातील गादी बाजूला सरकल्याने नसेवर दबाव आला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका भोंदू मसाज करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीदर जिल्ह्यातील औराद येथील गौरव कल्याणराव देशमुख हे १ डिसेंबर २०२५ रोजी मसाज करण्यासाठी उदगीर जवळील मादलापूर येथे सचिन मारोती दारनुले - देवणीकर याच्याकडे गेले होते. आरोपीने मसाजसाठी दीड हजार रुपये फी घेतली आणि गौरवला जमिनीवर पालथे झोपवले. मसाज सुरू केल्यानंतर आरोपीने चक्क गौरवच्या पाठीवर आणि कमरेवर उभे राहून जोरजोरात नाचण्यास सुरुवात केली. गौरवने वेदनेमुळे ओरडत "सावकाश करा, त्रास होत आहे" असे वारंवार विनवले. मात्र, "बॉडी मसाज असाच असतो" असे म्हणत आरोपीने पायाचे गुडघे, कोपर आणि मुठीने पाठीवर जोरात प्रहार केले.

गंभीर वैद्यकीय दुखापत
या अघोरी प्रकारामुळे गौरवच्या कमरेला आणि मणक्याला गंभीर जखम झाली. वैद्यकीय तपासणीत त्याच्या मणक्याची गादी बाजूला सरकून नस दबली गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे गौरवचे चालणे-फिरणे कठीण झाले असून अखेर सोमवारी सायंकाळी त्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी सचिन देवणीकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तुडमे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : लातूर: 'बॉडी मसाज' बना घातक; युवक घायल, मामला दर्ज

Web Summary : उदगीर में, एक मालिश करने वाले द्वारा मालिश के दौरान पीठ पर नाचने से एक युवक को रीढ़ की हड्डी में चोट आई। इससे नस दब गई और चलने-फिरने में दिक्कत हुई। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Latur: 'Body Massage' Turns Disastrous; Youth Injured, Case Filed

Web Summary : In Udgir, a youth suffered spinal injury after a masseuse allegedly danced on his back during a massage. The incident led to nerve compression, impacting mobility. Police have registered a case against the accused.