Royal Challengers Bengaluru to five-wicket win over Lucknow Super Giants : रसीख सलाम दार आणि भुवीच्या भेदक माऱ्यानंतर विराट कोहलीच्या इम्पॅक्टफुल खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने लखनौला एकतर्फी मात दिली. बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानातील या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर बंगळुरुच्या संघाने लखनौला १४६ धावांत ऑलआउट केले. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरुच्या संघाने ५ विकेट्स राखून फक्त ९१ चेंडूत सामना खिशात घातला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजीत रसीख सलाम दारसह भुवीचा जलवा
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रसीख सलाम दार (४ विकेट्स), भुवनेश्वर कुमार (३ विकेट्स), जोश हेजलवूड (१ विकेट्स) या जलगदती गोलंदाजांसह क्रुणाल पांड्याने (२ विकेट्स) आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत तगडी बॅटिंग लाईन अप असलेल्या लखनौच्या संघाला अवघ्या १४६ धावांत ऑलउट केले. लखनौकडून मिचेल मार्शनें ३२ चेंडूत केलेल्या ४० धावांशिवाय आयुष बडोनी ३८(२४) आणि मुकुल चौधरी ३८(२८) धावांची खेळी केली.
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
किंग कोहलीचं अर्धशतक हुकले, पण त्याची खेळी ठरली इम्पॅक्टफुल
या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना फिल सॉल्ट अवघ्या ७ धावंवर परतला. देवदत्त पडिक्कल हा देखील १० धावांवर माघारी फिरला. पण या दोन विकेट्स गमावल्यावर शंभर टक्के फिट नसलेल्या विराट कोहलीनं ३४ चेंडूत ४९ धावांची खेळी करत लखनौच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. कर्णधार रजत पाटीदारनं १३ चेंडूत २७ धावांची धमाकेदार खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. जितेश शर्मा ९ चेंडूत २३ धावांची खेळी करुन परतल्यावर टीम डेविड १४ (८) आणि रोमारियो शेफर्ड १४ (८) या दोघांनी १६ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आरसीबीचा विजय निश्चित केला.