१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला

विराट अर्धशतकाला मुकला, अनुष्का शर्माची रिॲक्शन व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 00:16 IST2026-04-16T00:15:46+5:302026-04-16T00:16:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RCB vs LSG Virat Kohli Misses Out Fifry Anushka Sharma's Reaction Goes Viral | १०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला

१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला

IPL 2026 RCB vs LSG, Virat Kohli Misses Out Fifry Anushka Sharma's Reaction Goes Viral :आयपीएल २०२६ च्या हंगामात गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सला एकतर्फी मात दिली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच विराट कोहली या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.  २०२३ पासून 'इम्पॅक्ट प्लेयर'चा नियम लागू करण्यात आला आहे. पण याआधी कधीच विराट कोहलीनं या नियमाचा आधार घेत फक्त बॅटिग केल्याचे पाहायला मिळाले नव्हते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विराट अर्धशतकाला मुकला, अनुष्का शर्माची रिॲक्शन व्हायरल

शंभर टक्के फिट नसल्यामुळे कोहलीनं या नियमाचा आधार घेत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला अन् संघाला दमदार सुरुवातही करून दिली. तो यंदाच्या हंगामातील आणखी एक अर्धशतक झळकावेल, असे वाटत असताना मोठा फटका खेळण्याच्या नादात तो ४९ धावांवर बाद झाला. अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकल्यावर स्टेडियम स्टँडमध्ये त्याला चीअर करण्यासाठी उपस्थित असलेली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची रिॲक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. 

IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)

नेमकं काय घडलं? चेज मास्टर विराट अर्धशतकाच्या उंबरठ्यावर कसा फसला?

बुधवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात लखनौच्या संघाने दिलेल्या १४७ धावांचा पाठलाग करताना बंगळुरुच्या संघाने ५ विकेट्स राखून १६ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजय निश्चित करत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली.  धावांचा पाठलाग करताना  फिल सॉल्ट ८ चेंडूत ७ धावा करुन परतल्यावर देवदत्त पडिक्कलही ११ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. एका बाजूनं दोन विकेट्स गमावल्या असताना चेज मास्टर विराट कोहलीनं आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. शंभर टक्के फिट नसताना इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात त्याने सामना सेट करणारी ४९ धावांची खेळी केली. पण आपल्या डावातील ३४ व्या चेंडूवर आवेश खानच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका खेळण्याच्या नादात ४९ धावांवर विकेट गमावली. ही विकेट पडल्यावर कॅमेरा स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्कावर फिरला. कोहलीच अर्धशतक हुकल्याची निराशा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आली. 

इम्पॅक्टफुल खेळीसह ऑरेंज कॅपही पटकावली

विराट कोहलीचं अर्धशतक हुकले असले तरी त्याने ४९ धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅप पटकावली आहे. ५ सामन्यानंतर विराट कोहलीनं २ अर्धशतकाच्या मदतीने ५७ च्या सरासहीसह १५८.३३ च्या स्ट्राईक रेटनं २२८ धावा केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात तो या शर्यतीत खूपच मागे पडला होता. पण RCB टॉपला पोहचवताना तोही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपर ठरला आहे. 

Web Title : कोहली का शानदार 49, अनुष्का की प्रतिक्रिया ने लूटी महफिल।

Web Summary : कोहली के 49 रन के बावजूद, आरसीबी ने एलएसजी को हराया। फिटनेस समस्याओं के कारण कोहली इम्पैक्ट प्लेयर के रूप में खेले और अर्धशतक से चूक गए। अनुष्का शर्मा की निराश प्रतिक्रिया वायरल हो गई।

Web Title : Kohli's impactful 49, Anushka's reaction steals spotlight in RCB's victory.

Web Summary : Despite Kohli's 49, RCB defeated LSG. Kohli, playing as impact player due to fitness issues, missed his fifty. Anushka Sharma's disappointed reaction went viral as RCB secured top spot.