IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)

त्याने टिपलेला हा झेल आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरू शकतो एवढा भारी होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 22:25 IST2026-04-15T22:22:58+5:302026-04-15T22:25:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Catch of the Tournament? Phil Salt takes a magnificent catch to dismiss Rishabh Pant in RCB vs LSG clash Watch Video | IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)

IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)

बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार रिषभ पंत याने पुन्हा एकदा आपल्यातील लढवय्या वृत्तीची झलक दाखवून दिली. जोश हेजलवूडचा वेगवान चेंडू लागल्यावर मैदान सोडणारा पंत अर्धा संघ तंबूत परतल्यावर जिद्दीनं मैदानात उतरला. पण खाते उघडून माघारी फिरला. ही विकेट स्विंग किग भुवनेश्वरच्या खात्यात जमा झाली असली तरी त्याचे सर्व श्रेय फिल सॉल्टला द्यावे लागेल. त्याने क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नजराणा पेश करत पंतला तंबूचा रस्ता दाखवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने टिपलेला हा झेल आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरू शकतो एवढा भारी होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब

लखनौच्या डावातील पाचव्या षटकात हेजलवूडचा आखुड टप्प्याचा चेंडू डाव्या हाताच्या कोपराला लागल्यामुळे रिषभ पंत रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण संघ अडचणीत सापडल्यावर १६ व्या षटकात आयुष बडोनीची विकेट गमावल्यावर रिषभ पंत मैदानात आला. पण भुवीच्या चेंडूवर मोठा फटका खेळून तो फसला. सॉल्टन त्याचा अप्रतिम झेल टिपला. याआधी सॉल्टनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शानदार झेलसह ईशान किशनच्या खेळीला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले होते.   

Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची ...

भुवीनं १० व्या डावात दुसऱ्यांदा केली पंतची शिकार

रिषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये आतापर्यंत १० वेळा समोरासमोर आले आहेत. यात पंतची कामगिरी दमदार राहिली होती. त्याने भुवीच्या ५६ चेंडूत ६०.५० च्या सरासरीसह २०१६.०७ च्या स्ट्राईक रेटनं १२१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. पण यावेळी ही आकडेवारी बाजूला ठेवून भुवीनं दुसऱ्यांदा पंतची शिकार केल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title : आईपीएल 2026: साल्ट ने शानदार कैच से पंत को किया आउट

Web Summary : आरसीबी बनाम एलएसजी मैच में, चोटिल ऋषभ पंत वापस लौटे लेकिन भुवनेश्वर कुमार का शिकार बने। फिल साल्ट ने पंत को आउट करने के लिए अद्भुत कैच लिया। साल्ट की शानदार फील्डिंग महत्वपूर्ण साबित हुई।

Web Title : IPL 2026: Salt's Stunning Catch Dismisses Pant in Thrilling Match

Web Summary : In a RCB vs LSG match, Rishabh Pant, injured earlier, returned but fell victim to Bhuvneshwar Kumar. Phil Salt took an amazing catch to dismiss Pant. Salt's brilliant fielding proved crucial.