Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या

अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या

Amitabh Jhunjhunwala Reliance ADAG arrest news : अनिल अंबानींचे निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. रिलायन्स होम फायनान्स कर्ज घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 22:45 IST2026-04-15T22:43:52+5:302026-04-15T22:45:06+5:30

Amitabh Jhunjhunwala Reliance ADAG arrest news : अनिल अंबानींचे निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. रिलायन्स होम फायनान्स कर्ज घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे.

Big development in Anil Ambani case! ED arrests trusted colleague Amitabh Jhunjhunwala Reliance ADAG arrest news | अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या

अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या समूहाचे माजी वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. 

रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी अटक केली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. झुनझुनवाला यांची दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपासासाठी ईडीने त्यांना न्यायालयात हजर केले आहे.

बँक कर्ज आणि शेल कंपन्यांचा वापर?
या प्रकरणाचा तपास प्रामुख्याने रिलायन्स समूहाच्या दोन महत्त्वाच्या कंपन्यांशी संबंधित आहे:
१. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL)
२. रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL)

तपासादरम्यान असे आढळले की, या कंपन्यांच्या माध्यमातून बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम थेट व्यवसायासाठी वापरण्याऐवजी शेल (बनावट) किंवा डमी कंपन्यांच्या जाळ्याद्वारे वळवण्यात आली होती. या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये झुनझुनवाला यांची भूमिका संशयास्पद असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

मनी लाँड्रिंगचा विळखा
अमिताभ झुनझुनवाला हे अनेक वर्षांपासून अनिल अंबानी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सल्लागार म्हणून ओळखले जातात. समूहाच्या आर्थिक रणनीती आखण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, आता बँकांच्या हजारो कोटींच्या कर्जाची अफरातफर केल्याच्या आरोपावरून ते ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. या अटकेमुळे रिलायन्स समूहातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : अनिल अंबानी के करीबी सहयोगी को ईडी ने मनी लॉन्ड्रिंग मामले में किया गिरफ्तार।

Web Summary : अनिल अंबानी के रिलायंस समूह की मुश्किलें बढ़ीं, पूर्व अधिकारी अमिताभ झुंझुनवाला को ईडी ने गिरफ्तार किया। आरोप है कि रिलायंस होम फाइनेंस और रिलायंस कमर्शियल फाइनेंस के लिए बैंक ऋण का उपयोग शेल कंपनियों के माध्यम से मनी लॉन्ड्रिंग में किया गया। वह अंबानी के करीबी थे।

Web Title : Anil Ambani's aide arrested by ED in money laundering case.

Web Summary : Anil Ambani's Reliance group faces more trouble as ex-official Amitabh Jhunjhunwala is arrested by ED for alleged money laundering via shell companies using bank loans meant for Reliance Home Finance and Reliance Commercial Finance. He was a close confidante of Ambani.