CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला

अनकॅप्ड गोलंदाजाने स्वस्तात दाखवला तंबूचा रस्ता

By सुशांत जाधव | Updated: April 14, 2026 20:47 IST2026-04-14T20:39:41+5:302026-04-14T20:47:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Ruturaj Gaikwad's Poor Run Of Form Continues CSK Captain Dismissed By Anukul Roy in IPL 2026 Clash vs KKR | CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला

CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला

आयपीएल २०२६ च्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. 'डॅडीज आर्मी' जवान होऊन मैदानात उतरली आहे. पण पाचवेळच्या विजेत्यां संघाकडून जी अपेक्षा आहे, ती झलक अजून तरी पाहायला मिळालेली नाही. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा फॉर्म संघाची चिंता वाढवणारा आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संघ जिंकला, पण कॅप्टनचा आत्मविश्वास नाही दिसला

चेन्नईतील चेपॉकच्या घरच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. पराभवाच्या हॅटट्रिकनंतर संजू सॅमसनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात CSK च्या संघाने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या विजयानंतर ऋतुराज गायकवाडचाही आत्मविश्वास उंचावेल अन् तो दमदार कमबॅक करेल, अशी आशा होती. पण त्याने पुन्हा एकदा निराश केले. 

VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा

अनकॅप्ड गोलंदाजाने स्वस्तात दाखवला तंबूचा रस्ता

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनसोबत डावाची सुरुवात केल्यावर ऋतुराज गायकवाड ६ चेंडूत ७ धावा करून माघारी फिरला. अनकॅप्ड भारतीय गोलंदाज अनुकूल रॉय याने रोव्हमन पॉवेल करवी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराला झेलबाद केले. याआधी पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याने १४ च्या सरासरीने फक्त ५६ धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेटही फक्त १०२ च्या घरात आहे. 

मुंबई इंडियन्सविरुद्ध आली होती अखेरची फिफ्टी, कमबॅकसाठी आता एकच मार्ग उरला

महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची मदार ही ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आली आहे. गत हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होण्यापूर्वी त्याने ५ सामने खेळताना दोन अर्धशतके झळकावली होती. २३ मार्चला चेपॉकच्या मैदानात त्याने २२ चेंडूत शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्या फलंदाजीची झलक दाखवली. पण IPL मध्ये तो पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. डावाची सुरुवात करण्याऐवजी मध्यफळीत येऊन फॉर्म मिळवण्याचा एक पर्याय त्याच्यासमोर आहे. आगामी सामन्यात तो याचा विचार करणार का? ते पाहण्याजोगे असेल. या परिस्थितीत आयुष म्हात्रे CSK च्या डावाची सुरुवात करू शकतो. हा प्लॅन CSK सह कॅप्टनच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. 

 

Web Title : CSK के लिए Ruturaj Gaikwad का फॉर्म चिंता का विषय; एक विकल्प शेष

Web Summary : Ruturaj Gaikwad का खराब फॉर्म चेन्नई सुपर किंग्स के लिए चिंताजनक है। आईपीएल 2026 की खराब शुरुआत के बाद, Gaikwad का संघर्ष जारी है। मध्यक्रम में बल्लेबाजी करने से उनका फॉर्म वापस आ सकता है।

Web Title : Ruturaj Gaikwad's Form a Concern for CSK; One Option Left

Web Summary : Ruturaj Gaikwad's poor form is worrying Chennai Super Kings. After a shaky start to IPL 2026, Gaikwad's struggles continue. A shift to middle-order batting might revive his form.