"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 00:08 IST2026-04-15T00:07:15+5:302026-04-15T00:08:55+5:30

Donald Trump Giorgia Meloni: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर टीकास्त्र डागले. 

"Iran will destroy you in two minutes", US President Trump lashes out at Italian Prime Minister Meloni | "इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 

"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 

इटलीतील पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारांमधील चांगले संबंध बिघडताना दिसत आहे. याला कारण ठरला आहे इराण. पंतप्रधान मेलोनी यांच्या सरकारने इराणविरोधात साथ देण्यास अमेरिकेला नकार दिला आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प चिडले आहेत. मेलोनी यांनी त्यांच्याच लोकांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

मंगळवारी (१४ एप्रिल) इटलीतील Corriere della Sera या प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनींवर जाहीरपणे हल्ला चढवला. 

मेलोनींबद्दल डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?

ट्रम्प यांनी मेलोनी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या मुद्द्यावर त्यांनी अमेरिकेची साथ देण्यास नकार दिला आहे. इटलीचे हित ज्यामध्ये आहे, त्यासाठीही पावले उचलत नाहीयेत, असे ट्रम्प म्हणाले. 

"मला वाटलं होतं की त्या धाडसी आहेत, पण माझा त्यांच्याबद्दलचे मत चुकीचे होते. मी त्यांची भूमिका बघून मी आश्चर्यचकित झालो", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

फोन कॉलवर झालेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी मेलोनींवर टीकास्त्र डागले. त्यामुळे या मुलाखतीची जास्त चर्चा होत आहे. कारण काही आठवड्यांपूर्वी याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे तोंडभरून कौतुक केले होते. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मेलोनींवर काय आरोप केले?

ट्रम्प म्हणाले की, "त्या फक्त एकच गोष्ट बोलत आहेत की, यामध्ये (इराण-अमेरिका युद्धात) इटली भाग घेणार नाही. त्यांना वाटते की अमेरिकेने त्यांच्यासाठी (इटली) काम करावे. आमच्यामध्ये बऱ्याच काळापासून चर्चा झालेली नाही. त्यांना आम्हाला ना नाटोमध्ये मदत करायची इच्छा आहे, ना अण्वस्त्रांपासून मुक्ती करण्यासाठी. मी जसा विचार केला होता, त्या तशाच आहेत."

मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. पोप XIV यांच्याबद्दल केलेले ट्रम्प यांचे विधान वाईट असल्याचे मेलोनींनी सुनावले होते. 

त्याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, "स्वीकारण्यासारख्या तर तुम्ही नाही आहात. कारण तुम्ही या गोष्टीची काळजीच नाहीये की, इराणजवळ अण्वस्त्र असू शकतात आणि संधी मिळताच तो इटलीला दोन मिनिटात उद्ध्वस्त करू शकतो. तुम्हाला आम्हाला नाटोमध्ये मदत करायची नाही आणि अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरही आम्हाला साथ द्यायची नाहीये", अशी टीका ट्रम्प यांनी केली. 

 

 

Web Title : ट्रंप मेलोनी पर बरसे: ईरान मिनटों में इटली को तबाह कर सकता है

Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने इटली की पीएम मेलोनी की ईरान के परमाणु कार्यक्रम के खिलाफ अमेरिका का समर्थन न करने पर आलोचना की। उन्होंने निराशा व्यक्त करते हुए कहा कि इटली नाटो या परमाणु निरस्त्रीकरण प्रयासों में मदद करने को तैयार नहीं है, जिससे विनाश का खतरा है।

Web Title : Trump Blasts Meloni: Iran Could Destroy Italy in Minutes

Web Summary : Donald Trump criticized Italian PM Meloni for not supporting the US against Iran's nuclear program. He expressed disappointment, stating Italy seems unwilling to aid NATO or nuclear disarmament efforts, risking destruction.