सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 00:24 IST2026-04-15T00:19:28+5:302026-04-15T00:24:05+5:30
सरसंघचालक भागवत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही वैयक्तिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास माजी सरन्यायाधीश बोबडे यांच्या सिव्हील लाईन्स येथील घरी पोहोचले. यानंतर दोघांमध्ये भेट झाली.
यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस.अब्दुल नझीर हेदेखील उपस्थित होते. नझीर हेदेखील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. या भेटीचे तपशील समोर येऊ शकले नाही.
माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये संघाच्या मुख्यालयाला तसेच आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार यांच्या निवासस्थानीदेखील भेट दिली होती.