जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़ ...
एकाच ठिकाणी सेवेत ६ व ३ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असणाºया महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून, कर्मचाºयांकडून यासाठीचे दहा पसंती क्रम प्रशासनाकडून घेण्यात येणार आहेत़ ...
कोरोना आजाराच्या अनुषंगाने खरबदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत गेल्या चार दिवसांत ९९ हजार ५२२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यामध्ये ५२२ जणांना श्वसन विकाराची लक्षणे आढळून आली आहेत़ ...
जगातील जवळपास १५० देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घालून सर्वांची झोड उडविली असताना परभणी जिल्ह्यात मात्र बेजबाबदार नागरिक दक्षता बाळगण्याऐवजी दैनंदिन बाबींनाच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे़ ...
जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ ...
कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ...