परभणी : दीड कोटीचा थांबला व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:18 PM2020-03-18T23:18:28+5:302020-03-18T23:18:53+5:30

कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Parbhani: One and a half crore transactions closed | परभणी : दीड कोटीचा थांबला व्यवहार

परभणी : दीड कोटीचा थांबला व्यवहार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
कोरोनाचे संशयित रुग्ण महाराष्टÑात आढळल्यानंतर राज्य शासनाने १६ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालयांसह आठवडी बाजार, मॉल्समधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे.
जिल्ह्याचा आर्थिक भार कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. याच व्यवसायावर आधारलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात चार दिवसांपासून कृषी मालाची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सद्यस्थितीला बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. या बाजार समितीत मागील आठवड्यात दिवसाकाठी तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल या बाजार समितीत होत होती. ती एक ते सव्वा कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.
येथील बाजार समितीत सोयाबिन, तूर, मूग, गहू, ज्वारी, चना या कृषी मालाची आवक होते. या शेतमालाची मागील आठवड्यात बºयापैकी आवक होती. मात्र चार दिवसांपासून ही आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सोयाबिनची आवक सुमारे ५०० क्विंटलने घटली आहे. मागील आठवड्यात सरासरी ७०० क्विंटल सोयाबिनची आवक होत होती. मात्र दोन दिवसांपासून सुमारे २०० ते ३०० क्विंटलच सोयाबिन बाजारपेठेत येत आहे. अशीच परिस्थिती हरभºयाचीही (चना) झाली आहे. मागील आठवड्यात १ हजार क्विंटल आवक झालेल्या हरभºयाची आवक दोन दिवसांपासून मात्र ५०० ते ६०० क्विंटलवर येऊन ठेपली आहे.
कोराना या आजाराचा सर्वाधिक परिणाम राज्यस्तरीय बाजारपेठेवर झाला आहे. ठिकठिकाणाहून होणारी शेतमालाची निर्यात बंद झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत.
शिवाय कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येण्यास शेतकरी पुढे येत नसून, त्याचा परिणाम येथील बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे.
निम्म्याने घटले शेतमालाचे दर
४बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांत ५० टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीवर बंधने आली आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात ४ हजार ५०० रुपये क्विंटल या दराने सोयाबिनची विक्री झाली. मात्र मागणी नसल्याने मंगळवार आणि बुधवारी या दरात मोठी घट झाली. ३ हजार ४५० ते ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबिनची खरेदी होत आहे. तसेच चन्याच्या दरातही अल्पशी घट झाली आहे. ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असलेला चन्याचा दर सध्या ३ हजार ५०० ते ३ हजारा ६०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.
गव्हाची आवक सुरू
रबी हंगामातील गव्हाची अनेक भागात काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे गव्हाची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. साधारणत: ४०० ते ५०० क्विंटल गव्हाची येथील बाजारपेठेत आवक झाली होती. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने गव्हाचा पेरा वाढला आहे. त्यामुळे गव्हाची आवक वाढणे अपेक्षित आहे. मात्र गव्हाच्या आवकीवरही कोरोनाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षभरापासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या आडत व्यापाराला यावर्षीही फटका सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात शेतमालाची आवक बºयापैकी वाढली होती. मात्र कोरोनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. त्यामुळे शेतकरीही घराबाहेर पडत नसून, या बाजारपेठेतील आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.
-मोतीसेठ जैन, अध्यक्ष, आडत व्यापारी असोसिएशन

Web Title: Parbhani: One and a half crore transactions closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.