आरटीईच्या चौथ्या ड्रॉमध्ये एका मुलीला तिच्या घरापासून १०० किलोमीटर दूरची शाळा मिळाली आहे. गुगल मॅपिंगनुसार नागपुरात राहणारी मुलगी शिकण्यासाठी १०० किलोमीटर दूर अंतरावर नरखेडला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांना बाहेरून औषधे किंवा चाचण्या लिहून देताना केवळ वरिष्ठ डॉक्टरांनीच प्रीस्क्रीप्शन लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांनी ते लिहून देऊ नये, हे नवे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले आहेत. ...
लग्नानंतर हुंड्यासाठी छळ करून दोन लाख रुपये हडपणाऱ्या पतीने अनैसर्गिक बलात्कार केल्याची तसेच त्याच्या नातेवाईकांनीही त्रास दिल्याची तक्रार एका विवाहितेने तहसील ठाण्यात नोंदवली. ...
मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. ...
कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे. ...
शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला. ...
मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला. ...