मनपा  : वीजनिर्मिती नाही, पण लघुपटावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:20 AM2019-09-11T00:20:55+5:302019-09-11T00:23:43+5:30

कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे.

Municipal Corporation: No electricity, but millions of Ruppies spent on documentry films | मनपा  : वीजनिर्मिती नाही, पण लघुपटावर लाखोंचा खर्च

मनपा  : वीजनिर्मिती नाही, पण लघुपटावर लाखोंचा खर्च

googlenewsNext
ठळक मुद्देकचऱ्यापासून वीजनिर्मिती : सुरू होण्यापूर्वीच प्रकल्प बारगळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारणार होती. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. १८ जुलै २०१८ रोजी सुरेश भट सभागृहात या प्रकल्पाचे डिजिटल भूमिपूजन करण्यात आले. यावेळी चलचित्र संकलन करून कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे.
भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. दररोज ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार होती. या कामाचे कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. डिसेंबर २०१९ पर्यंत हा प्रकल्प उभारला जाणार होता. यामुळे भांडेवाडी येथील कचऱ्याची समस्या मार्गी लागणार होताी. परंतु कचऱ्यापासून खतनिर्मिती व बायो-मायनिंग प्रकल्प आल्यानंतर वीजनिर्मिती प्रकल्प रोखण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले. स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पावर आधारित लघुपट निर्माते मे. राजकारणे मीडिया वेव्हज प्रा.लि. यांना ४.१० लाखांचे बिल देण्याला मंजुरी देण्यात आली.

एनडीएस पथकाला मुदतवाढ
आरोग्य विभागातील मनुष्यबळ लक्षात घेता उपद्रव शोध पथकात (एनडीएस) कंत्राटी ८७ पदे निर्माण करण्यात आली आहेत. ११ महिन्याच्या करारावर नियुक्ती करण्याची २०१७ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. यात ४१ लष्करी जवानांची निवड करण्यात आली होती. त्यांचा कालावधी संपला असल्याने या पथकातील जवानांच्या नियुक्तीला मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

कन्हानचे पाणी गोरेवाड्यात आणणार
कन्हान नदीपात्रात जून ते डिसेंबर या कालावधीत मुबलक पाणी असते. या पाण्याची रोहणा गावाजवळ उचल करून ते पेंच जलाशयातील पाण्याचे वहन करणाऱ्या २३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे. या कामाला गती देण्यासाठी या कामाचा विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे. यावर ९७ लाख ६२ हजार २१० रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

Web Title: Municipal Corporation: No electricity, but millions of Ruppies spent on documentry films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.