जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:38 PM2024-05-01T20:38:03+5:302024-05-01T20:42:59+5:30

President Droupadi Murmu In Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामललाची आरती केली.

president droupadi murmu offers prayers and aarti to ram lalla at ram mandir in ayodhya | जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन

जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन

President Droupadi Murmu In Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. या सोहळ्यानंतर भाविकांचा महासागर अयोध्येत लोटला. राम नवमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांसह सेलिब्रिटी, नेते, मंत्री, मान्यवरांनी अयोध्येतील राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. यातच आता भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न देण्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर सातत्याने टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा लावून धरण्यात आला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौरा करत, राम मंदिरात जाऊन रामललाच्या चरणी नतमस्तक झाल्या. 

द्रौपदी मुर्मू यांनी प्रथम शरयू तीरावर जाऊन नदीचे पूजन आणि आरती केली. यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी हनुमान गढी येथे जाऊन रामभक्त हनुमंतांचे दर्शन घेतले. तसेच राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेतले. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी रामललाची मनोभावे आरतीही केली. द्रौपदी मुर्मू यांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्यावतीने सत्कार, सन्मान करण्यात आला. द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिराची प्रतिकृती आणि रामललाची प्रतिमा भेट देण्यात आली.

श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामललाचे दर्शन घेतले. द्रौपदी मुर्मू यांचे रामललाबद्दल असलेले समर्पणही दिसले. त्या रामललासमोर नतमस्तक झाल्या. आरती केली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती रामलला प्रति किती समर्पित आहे, हेच यातून दिसून येते, असे सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: president droupadi murmu offers prayers and aarti to ram lalla at ram mandir in ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.