Next

Blood Oxygen Monitor करणार One Plus चं फिटनेस बॅंड | One Plus launches Fitness band | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:37 AM2021-01-14T11:37:16+5:302021-01-14T11:37:36+5:30

OnePlus नं आपला पहिला फिटनेस बॅंड लॉंच केला आहे. सर्वप्रथम कंपनीकडून हा बँड भारतात लॉंच करण्यात आला आहे. भारतात हा बॅंड लॉंच झाल्यानंतर आता जगभरातील अन्य देशांमध्ये हा बॅंड लॉंच केला जाईल. OnePlus Band हा भारतात Mi Smart Band 5 ला टक्कर देणार आहे. या बॅँड ची किंमत २ हजार ४९९ रुपये इतकी आहे. तसंच हा बॅंड ब्लॅक कलर व्हेरिअंटमध्ये उपल्बध होणार आहे. OnePlus च्या वेबसाईटशिवाय Amazon, Flipkart, आणि कंपनीच्या स्टोअर्समधून ग्राहकांना हा बॅंड खरेदी करता येणार आहे. १३ जानेवरीपासून वनप्लस बँडची भारतात विक्री सुरू करण्यात येणार आहे.