गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. ...
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊनही गुन्हेगारी कमी झालेली नाही. घरफोडी, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप सुरू आहे. प्रारूप मतदारयादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली. या यादीतील मतदारांना ओळखपत्र मिळणार आहे. ...
लोणावळा-पुणे लोकलला नुकतीच ४२ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत सेवमध्ये अनेक सुधारणा झाल्या. पण काही समस्या तशाच आहेत. त्या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ...
वाहनतळाच्या जागेतच बंद पडलेली वाहने वर्षानुवर्षे उभी असल्याने अन्य वाहनांना जागा अपुरी पडत आहे. महापालिका भवनातील अडगळ हटविण्याची मागणी केली जात आहे. ...