पिंपरी महापालिकेची ६१० राजकीय फ्लेक्सवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:15 PM2019-03-18T13:15:07+5:302019-03-18T13:19:57+5:30

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहे.

Pimpri Municipal Corporation's 610 State Flex Action | पिंपरी महापालिकेची ६१० राजकीय फ्लेक्सवर कारवाई

पिंपरी महापालिकेची ६१० राजकीय फ्लेक्सवर कारवाई

Next
ठळक मुद्देखासगी जागेत लावलेले फ्लेक्स हटविण्यासाठी ७२ तासांची मुदत मुदत संपल्यानंतरही अनेक राजकीय बॅनर्स आढळून आल्याने ही कारवाई

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने सहाशे दहा राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. या दैनंदिन कारवाईचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जात आहे. 
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहे. महापालिका मालमत्ता व आवारातील राजकीय नेत्यांचे फोटो, बॅनर्स झाले आहे. त्यामध्ये महापालिका पदाधिका-यांच्या दालनांचा समावेश आहे. ही कार्यवाही आचारसंहिता लागू जाल्यानंतर ४८ तासांत करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स, अनधिकृत फ्लेक्स हटविण्यासाठी ४८ तासांची मुदत आहे. तर खासगी जागेत लावलेले फ्लेक्स हटविण्यासाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे.मुदत संपल्यानंतरही अनेक राजकीय बॅनर्स आढळून आल्याने ही कारवाई केली आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. शहराच्या विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसात महापालिकेने सहाशे दहा राजकीय फ्लेक्सवर कारवाई केली आहे. 

Web Title: Pimpri Municipal Corporation's 610 State Flex Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.