दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:10 AM2019-03-18T03:10:25+5:302019-03-18T03:10:47+5:30
गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
![Two ATMs break up to 35 lakh lamps | दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास Two ATMs break up to 35 lakh lamps | दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/crime-logo_20180148008.png)
दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास
पिंपरी : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
सचिन शिवकरण काळगे (वय २१, रा. अश्विनी सुपर मार्केटजवळ, बापूजीबुवानगर, थेराव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धावडेवस्ती येथे स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर असून, त्यामध्ये एटीएमच्या दोन मशीन आहेत. शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सव्वा अकरा या वेळेत अज्ञात चोरट्याने दोन्ही एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापला. त्यानंतर एका मशीनमधील २० लाख १८ हजार ४०० रुपये तर दुसऱ्या मशीनमधील १५ लाख ७ हजार ७०० रुपये असे एकूण ३५ लाख २६ हजार रुपये लंपास केले.