Nitin Nabin Latest News in Marathi | नितीन नबीन मराठी बातम्याFOLLOW
Nitin nabin, Latest Marathi News
भाजपाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. नितीन नबीन हे ५ वेळा बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. २००६ साली पहिल्यांदा पटना वेस्ट विधानसभेतील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून ते २०१०, २०१५, २०२०, २०२५ सलग ४ वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. नबीन यांनी बिहारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्याशिवाय भाजपा युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी आणि बिहार युवा मोर्चाचे ते अध्यक्षही राहिले आहेत. २०२५ मध्ये भाजपाच्या संसदीय बोर्डाने नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. Read More
नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, ती पक्षाच्या विचारसरणी आणि राष्ट्रवादी चळवळीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी वर्णन केले. विकसित भारतासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर देत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे ...
महत्वाचे म्हणजे, 1980 मध्ये जनसंघानंतर उदयास आलेल्या भाजपाला आतापर्यंत एकूण 12 राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत, कुठल्याही अध्यक्षाला मतदानाला सामोरे जावे लागलेले नाही. अर्थात सर्वच अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. ...