Nitin Nabin Latest News in Marathi | नितीन नबीन मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Nitin nabin, Latest Marathi News
भाजपाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. नितीन नबीन हे ५ वेळा बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. २००६ साली पहिल्यांदा पटना वेस्ट विधानसभेतील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून ते २०१०, २०१५, २०२०, २०२५ सलग ४ वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. नबीन यांनी बिहारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्याशिवाय भाजपा युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी आणि बिहार युवा मोर्चाचे ते अध्यक्षही राहिले आहेत. २०२५ मध्ये भाजपाच्या संसदीय बोर्डाने नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. Read More