अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:36 IST2026-01-20T14:32:56+5:302026-01-20T14:36:18+5:30

महत्वाचे म्हणजे, 1980 मध्ये जनसंघानंतर उदयास आलेल्या भाजपाला आतापर्यंत एकूण 12 राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत, कुठल्याही अध्यक्षाला मतदानाला सामोरे जावे लागलेले नाही. अर्थात सर्वच अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत.

From Atal bihari vajpayee to Advani and JP Nadda to nitin Nabin BJP has had 12 national presidents in 45 years, see the list | अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट

अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट

आज भारतीय जनता पक्षाला नितिन नबीन यांच्या रुपाने नवा अध्यक्ष मिळाला. नबीन हे भाजपाचे 12 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी, गेल्या वर्षात नितिन नबीन यांना पक्षाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. 2019 मध्येच पक्षात कार्यकारी अध्यक्ष पद निर्माण करण्यात आले. 

नबीन हे बिहारच्या बांकीपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपाध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. मात्र संसदीय बोर्ड हा कालावधी वाढवूही शकते. महत्वाचे म्हणजे, नितिन नबीन यांच्या खांद्यावर देशातील सर्वात मोठ्या पक्षाची धुरा तर असेलच, शिवाय, दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार आणि तो बळकट करण्याची मोठी जबाबदारीही असेल.

भाजपाचे आतापर्यंतचे 12 बॉस... -
महत्वाचे म्हणजे, 1980 मध्ये जनसंघानंतर उदयास आलेल्या भाजपाला आतापर्यंत एकूण 12 राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत, कुठल्याही अध्यक्षाला मतदानाला सामोरे जावे लागलेले नाही. अर्थात सर्वच अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत.

देशात आणीबाणीनंतरच्या राजकीय उलथा-पालथीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नानाजी देशमुख, के.आर. मलकानी, सिकंदर बख्त, विजय कुमार मल्होत्रा, विजयराजे सिंधिया, भैरोसिंग शेखावत, शांता कुमार, राम जेठमलानी आणि जगन्नाथराव जोशी यांनी भाजपची मुहूर्तमेढ रोवली.

अटल बिहारी वाजपेयी (1980-1986) - अटलजी हे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष होते. पक्षाच्या पहिल्या अधिवेशनत अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणातून "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा।" ही घोषणआ दिली होती.

लालकृष्ण आडवाणी (1986-1990, 1993-1998, 2004-2005) -  अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर, भाजपची धुरा लाल कृष्ण आडवाणी यांच्या खांद्यावर आली. ते तीन वेळा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यांनी 1990 मध्ये राम रथ यात्रा काढली होती. ही यात्रा सोमनाथ ते अयोधेपर्यंत होती.

डॉ. मुरली मनोहर जोशी (1991-1993) - आडवाणींनंतर, डॉ. मुरली मनोहर जोशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तेव्हा रामजन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचले होते. 1991 मध्ये भाजपा प्रमुख विरोधीपक्ष होता. त्यांच्याच कार्यकाळात म्हणजेच, 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली गेली होती. 

कुशा भाऊ ठाकरे 1998-2000 - कुशाभाऊ ठाकरे यांचा कार्यकाळ हा पहिल्या पूर्ण एनडीए सरकारचा होता. ते आरएसएसचे होते आणि त्यांनी संघटना मजबूत करण्यावर भर दिला.

यानंतर, बंगारू लक्ष्मण (2000-2001), के. जाना कृष्णमूर्ति (2001-2002), वेंकैया नायडू (2002-2004), राजनाथ सिंह (2005-2009, 2013-2014), नितिन गडकरी (2010-2013), अमित शाह (2014-2017,2017-2020), जेपी नड्डा (2020-2026) यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. आता नितिन नबीन (2026- आतापर्यंत) हे भाजपाचे 12 वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 

Web Title : भाजपा का अध्यक्षीय सफर: वाजपेयी-आडवाणी युग से नड्डा और नवीन तक

Web Summary : नितिन नवीन जे.पी. नड्डा के बाद भाजपा के 12वें राष्ट्रीय अध्यक्ष बने। 1980 से पार्टी ने वाजपेयी और आडवाणी जैसे नेताओं को देखा है। नवीन को दक्षिण भारत में पार्टी का विस्तार करने का काम सौंपा गया है। सभी अध्यक्ष निर्विरोध चुने गए हैं।

Web Title : BJP's Presidential Journey: From Vajpayee-Advani Era to Nadda and Naveen

Web Summary : Nitin Naveen becomes BJP's 12th national president, succeeding J.P. Nadda. The party, since 1980, has seen leaders like Vajpayee and Advani. Naveen faces the task of expanding the party, especially in South India. All presidents have been elected unopposed.