पुराच्या पाण्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांच्या वीजमीटरचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांचे वीजमीटर तुटल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराची तीव्रता आणि नुकसानीचा अंदाज घेता महावितरणने पूरग्रस्त भागातील नुकसान झालेले वीजमीटर बदलून दे ...
शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीज ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील विद्युत जनित्र व रोहित्राभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महावितरणने अनिश्चित काळासाठी विद्युत पुरवठा खंडित केला आहे, तर खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे ...
रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल् ...
येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला. ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट ...