विदर्भातील १६.४० लाख वीज ग्राहकांवर २६२ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 08:03 PM2019-08-03T20:03:32+5:302019-08-03T20:06:01+5:30

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहेत.

16.40 lakh electricity consumers in Vidarbha owe Rs 262 crores | विदर्भातील १६.४० लाख वीज ग्राहकांवर २६२ कोटी थकीत

विदर्भातील १६.४० लाख वीज ग्राहकांवर २६२ कोटी थकीत

googlenewsNext
ठळक मुद्देथकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा : प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहेत.
घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करण्यासोबतच थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची नोंद प्रणालीत करण्याच्या स्पष्ट सूचनाही प्रादेशिक संचालकांनी केल्या आहेत. प्रत्येक लाईनस्टाफला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य द्या, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत देण्याच्या सूचनाही दिलीप घुगल यांनी केल्या आहेत. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी रीतसर नियोजन करून त्याची योग्य अंमलबजावणी करा; सोबतच वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
अशी आहे थकबाकी
जिल्हा               वीज ग्राहक            एकूण थकबाकी
--------------------------------------------------
अकोला          १,६४,०५९               ३४ कोटी १० लाख
बुलडाणा         २,०४,९४३              ३३ कोटी ६८ लाख
वाशीम            ९१,३१५                  १८ कोटी १६ लाख
अमरावती        २,४४,४८५             ४१ कोटी २२ लाख
यवतमाळ        २,०१,९४३              ३३ कोटी ७९ लाख
चंद्रपूर              १, २८,०१३             १७ कोटी ४३ लाख
गडचिरोली        १,०६,०६५            १० कोटी ३ हजार
गोंदिया            ८३,५४५                १० कोटी २४ लाख
भंडारा            ८८,४६६                 ९ कोटी ६३ लाख
वर्धा                 १,१०,०००               १४ कोटी ९६ लाख
नागपूर ग्रामीण १,१९,५७०             २० कोटी ५६ लाख
नागपूर शहर   ९७,१६७                १८ कोटी ३९ लाख

Web Title: 16.40 lakh electricity consumers in Vidarbha owe Rs 262 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.