देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून किंवा मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होण्याची शक्यता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त करत मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या क्षेत्रात मोबाईल जॅमर लावावा अशी मागणी चव्हाणांनी केली आहे ...
राजीव गांधी यांना पक्षातील नेत्यांनी क्लिन चिट दिले होते. परंतु, ते एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, अशी टीका मोदींनी केली होती. देश चुका माफ करू शकतो, परंतु, धोक्याला कधीही माफी नसते, असंही मोदी म्हणाले होते. ...
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. ...
अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. ...
युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ...