Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात

संजूच्या नाबाद शतकाच्या जोरावर CSK चं द्विशतक अन्...

By सुशांत जाधव | Updated: April 23, 2026 21:36 IST2026-04-23T21:34:39+5:302026-04-23T21:36:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Chennai Super Kings Star Sanju Samson 5th IPL Century vs Mumbai Indians Equal Rohit Sharma Record | Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात

Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात

IPL 2026 Chennai Super Kings Star Sanju Samson 5th IPL Century vs Mumbai Indians : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर संजू सॅमसन याने वानखेडेच्या मैदानातील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ५४ चेंडूत यंदाच्या हंगामातील दुसरे आणि आयपीएलमधील पाचवे शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात २०७ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २०८ धावांचे टार्गेट सेट केले आहे. मुंबई इंडियन्ससमोर शतकी धमाक्यासह संजू सॅमसन याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी केली आहे. विराट कोहली आणि अभिषेक शर्मासह शुभमन गिलचा विक्रमही आता त्याच्या अगदी टप्प्यात आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संजूचं विक्रमी शतक, हिटमॅन रोहितची बरोबरी अन्...

टी-२० कारकिर्दीतील संजू सॅमसन याचे हे आठवे शतक ठरले. यासह त्याने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोरीचा डाव साधला. हिटमॅनच्या खात्यातही टी-२० मध्ये ८ शतकांची नोंद आहे. भारताकडून छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि अभिषेक शर्मा प्रत्येकी ९-९ शतकासह संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहेत. संजू यंदाच्या हंगामात आपला क्लास शो कायम ठेवत या दोघांनाही मागे टाकू शकतो. 

MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात

 संजू सॅमसन याने पाचव्या शतकासह आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुलची बरोबरी केली आहे. या यादीत विराट कोहली ८ शतकासह अव्वलस्थानी आहे. जोस बटलर याने ७ शतके झळकावली असून ख्रिस गेलच्या खात्यात  ६ आयपीएल शतकांची नोंद आहे.
 

Web Title : संजू सैमसन का शतक, रोहित शर्मा की बराबरी; कोहली का रिकॉर्ड खतरे में

Web Summary : संजू सैमसन के मुंबई इंडियंस के खिलाफ तूफानी शतक ने रोहित शर्मा के टी20 रिकॉर्ड की बराबरी की। अब वह विराट कोहली के भारतीय खिलाड़ी द्वारा सर्वाधिक टी20 शतकों के रिकॉर्ड को तोड़ने के करीब हैं। उनके पांचवें आईपीएल शतक ने उन्हें केएल राहुल के बराबर ला खड़ा किया।

Web Title : Sanju Samson's Century Equals Rohit Sharma; Kohli's Record Threatened

Web Summary : Sanju Samson's explosive century against Mumbai Indians equals Rohit Sharma's T20 record. He is now close to surpassing Virat Kohli's record for most T20 centuries by an Indian player. His fifth IPL century puts him level with KL Rahul.