देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
हिंसा, गुन्हेगारी आणि आंतकवाद पाप आहे. हे पाप कुणीही करू शकते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही हे पाप करू शकते. अनेकांनी असे पाप केले आहे. मात्र आतंकवादाला धर्म नसतो. परंतु, अतिरेक्याचा धर्म असतो, अस स्वराने नमूद केले. ...
लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत. ...
गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले. ...
लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला. ...
केंद्रीयमंत्री विजय गोयल आणि भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी सहरावत यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले. एका आठवड्यात 'आप' सोडणारे सहरावत तिसरे आमदार ठरले आहे. ...