देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, या घटनाक्रमावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. ...
भाजपने महाराष्ट्रात राज्यघटना पायदळी तुडवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असून, त्याविरोधात शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केले. ...
महाराष्ट्रातील धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना सूचना देऊन सर्व काँग्रेस आमदारांना एकजूट आणि सुरक्षित ठेवण्यास सांगितले ...