"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:20 IST2026-04-18T16:17:29+5:302026-04-18T16:20:14+5:30

अंजली दमानिया यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. 

"Jitendra Shelke's death an accident or a murder?" Anjali Damania raises a sensational question | "जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न

"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न

शिवनिका संस्थानचे जितेंद्र शेळके यांचे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाती निधनाने खळबळ उडाली आहे. मात्र, हा केवळ अपघात नसून तो एक नियोजित घातपात असण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या तांत्रिक बाबींकडे लक्ष वेधत त्यांनी तपासाची दिशा बदलण्याची मागणी केली आहे.

लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?

अंजली दमानिया यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. 

१. अनाकलनीय वेग 

समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस लेनमध्ये गाडीचा वेग १२० किमी असणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. मग इतक्या वेगात गाडी ट्रकला कशी धडकली?

२. अपघाताचे स्वरूप

मधल्या लेनमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला १२० च्या वेगाने धडक बसणे हे पूर्णतः अनाकलनीय आहे.

३. घातपाताचा संशय

हे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाले की हा आधीच आखलेला एखादा कट होता? याबाबत मोठी शंका निर्माण होत आहे.

अपघाताच्या तांत्रिक बाबी पाहता, हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. उभ्या ट्रकला धडक देणे आणि १२० चा वेग असणे यात तथ्य आढळत नाही," असे दमानिया यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची केवळ अपघात म्हणून नोंद न करता, यामागे काही घातपात आहे का, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

तीन दिवसांपूर्वी शेळके यांची ईडीने चौकशी केली होती, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. शेळके शिवलिका संस्थेच्या नंबर दोन पदावर होते, त्यांच्यानंतर कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर आहेत. यामुळे या अपघाची चौकशी झाली पाहिजे, असेही दमानिया म्हणाल्या.

Web Title : जितेंद्र शेळके की मौत: दुर्घटना या साजिश? सवाल उठे।

Web Summary : अंजलि दमानिया ने जितेंद्र शेळके की राजमार्ग मृत्यु में साजिश की आशंका जताई, असंभव गति और दुर्घटना के विवरण का हवाला दिया। उन्होंने एक साधारण दुर्घटना रिपोर्ट से परे पूरी जांच की मांग की, पहले की ईडी जांच और शेळके के संगठन के भीतर संभावित उद्देश्यों पर प्रकाश डाला।

Web Title : Jitendra Shelke's Death: Accident or Conspiracy? Questions Raised.

Web Summary : Anjali Damania suspects foul play in Jitendra Shelke's highway death, citing impossible speed and accident specifics. She demands a thorough investigation beyond a simple accident report, highlighting a prior ED inquiry and potential motives within Shelke's organization.