छत्तीसगडमधील वेदांता प्लांटमध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर जिंदाल स्टीलचे चेअरमन नवीन जिंदाल अनिल अग्रवाल यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अनिल अग्रवाल यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
१४ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सिंगहतराई येथील वेदांताच्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात २० कामगारांचा मृत्यू झाला होता, तर अनेक कामगारांवर सध्या उपचार सुरू आहेत. हे अत्यंत दुःखद असल्याचं जिंदाल यांनी म्हटलं आहे.
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
... ही चिंतेची बाब
"छत्तीसगडमधील ही शोकांतिका अत्यंत दुःखद आहे. २० कुटुंबांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे. या कुटुंबांना योग्य नुकसानभरपाई, उदरनिर्वाहासाठी मदत आणि या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागण्यांबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही," असं जिंदाल म्हणाले.
The tragedy in Chhattisgarh is deeply painful. 20 families have lost everything. Proper compensation, livelihood support for the families, and a thorough investigation are non-negotiable.
— Naveen Jindal (@MPNaveenJindal) April 18, 2026
But naming Shri @AnilAgarwal_Ved Ji in the FIR before any investigation raises serious… pic.twitter.com/FCXTENN3vs
"कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच एफआयआरमध्ये अनिल अग्रवाल यांचं नाव समाविष्ट करणें गंभीर चिंता निर्माण करतं. ते असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वकष्टानं यश मिळवलं आहे. ते एका सामान्य आणि मागास समाजातून येतात, ज्यांनी शून्यातून जागतिक स्तरावरील उद्योग उभा केला. त्या प्लांटच्या कामकाजात त्यांची कोणतीही भूमिका नव्हती," असंही ते पुढे म्हणाले.
सार्वजनिक क्षेत्रातील अपघातांचा दाखला
नवीन जिंदाल यांनी सरकारी क्षेत्रातील उदाहरणं देत प्रश्न उपस्थित केला की, "जेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील प्लांट्स किंवा रेल्वेमध्ये अपघात होतात, तेव्हा आपण अध्यक्षांचं नाव एफआयआरमध्ये टाकतो का? आपण तसं करत नाही. हाच निकष खाजगी क्षेत्रालाही लागू व्हायला हवा. आधी चौकशी करा, पुराव्यांच्या आधारे जबाबदारी निश्चित करा आणि त्यानंतरच कोणतीही कारवाई करा," असं जिंदाल म्हणाले.
भारताच्या 'विकसित भारत' व्हिजनसाठी अनिल अग्रवाल यांच्यासारख्या लोकांची गरज आहे, जे सतत गुंतवणूक आणि निर्माण कार्य सुरू ठेवतील. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा गुंतवणूकदारांचा या व्यवस्थेवर विश्वास असेल, असंही ते पुढे म्हणाले.
