साडीत पोट सुटलेलं दिसतं? साडी नेसताना ८ गोष्टी लक्षात ठेवा, चापूनचोेपून नेसा साडी-दिसाल सुडौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:24 IST2026-04-23T17:53:28+5:302026-04-23T19:24:30+5:30

How To Wear Saree Perfectly (8 Tricks To Wear Saree Perfectly) : मोठ्या फुलांच्या किंवा मोठ्या बुट्ट्यांच्या साडीऐवजी बारीक प्रिंट्स आणि उभ्या रेषा असलेल्या साड्या निवडा.

साडीमध्ये सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी केवळ साडीची निवड महत्वाची नसते तर ती नेसण्याची पद्धतही तितकीच महत्वाची असते. साडीत पोट फुगीर दिसू नये म्हणून काही टिप्स फॉलो करू शकता. (How To Drape Saree Perfectly)

कॉटन किंवा ऑर्गेंझा यांसारख्या कडक कापडाऐवजी शिफॉन, जॉर्जेट, क्रेप यांसारख्या अंगाला चापून-चोपून बसणाऱ्या साड्या निवडा. (How To Wear Saree To Slim Look)

साध्या सुती घोळदार पेटीकोटऐवजी शेपवेअर वापरा. यामुळं कंबर आणि पोटाकडेचा भाग दाबला जातो आणि साडीला सुबक आकार मिळतो. (How To Wear Saree Perfectly)

पोटापासून खूप निऱ्या एकाच जागी खोचल्यामुळे तो भाग फुगीर दिसतो. निऱ्या शक्त तितक्या पसरवून व्यवस्थित सेट करून खोचा.

साडी खूप वर न नेसता ती नाभीच्या किंचित खाली नेसल्यानं पोटाचा घेर कमी भासतो.

पदराच्या बारीक निऱ्या काढण्यापेक्षा मोकळा पदर सोडल्यास पोटाचा भाग झाकला जातो आणि तुम्ही उंच व बारीक दिसता.

मोठ्या फुलांच्या किंवा मोठ्या बुट्ट्यांच्या साडीऐवजी बारीक प्रिंट्स आणि उभ्या रेषा असलेल्या साड्या निवडा.

साडीच्या निऱ्या आणि पदर जागेवर राहण्यासाठी सेफ्टी पिन्सचा वापर स्मार्ट पद्धतीनं करा. जेणेकरून साडी परफेक्ट दिसेल.