ठणकणाऱ्या दाढा, दुखणाऱ्या हिरड्या चटकन बऱ्या होतील, 'हे' घरगुती दंतमंजन वापरा, मोत्यासारखे चमकतील दात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 17:00 IST2026-04-23T16:55:10+5:302026-04-23T17:00:51+5:30

काही जणांचे दात अतिशय संवेदनशील झालेले असतात. त्यामुळे थंड, गरम खाल्लं की त्यांच्या दातांना लगेच झिणझिण्या येतात.

हिरड्या दुखत असतील, दात ठणकत असेल तर आपण वेगवेगळे टूथपेस्ट वापरून पाहतो. पण त्याने म्हणावा तसा फरक पडत नाही.

म्हणूनच आता हे एक घरगुती दंतमंजन वापरून दात स्वच्छ करून बघा. काही दिवसातच तुम्हाला खूप चांगला फरक दिसून येईल.

हे दंतमंजन तयार करण्यासाठी दालचिनीच्या दोन ते तीन इंचाच्या ३ काड्या घ्या आणि त्याची बारीक पावडर करा.

यामध्ये २० ते २५ लवंगांची पावडर घाला. त्याचबरोबर एक टीस्पून बेकिंग सोडा घाला.

एक टीस्पून मीठ आणि एक टीस्पून हळदही घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून एका डबीमध्ये ठेवा.

आता हे झालं तुमचं घरगुती दंतमंजन तयार. रोज सकाळी आणि रात्री याच दंत मंजनने काही दिवस दात घासून बघा.

तुमच्या दुखणाऱ्या दाढा आणि हिरड्या तर बऱ्या होतीलच, पण दातांवरचा पिवळटपणा कमी होऊन त्यांच्यावर छान चमकही येईल. दात पांढरेशुभ्र दिसतील. हा उपाय healthy_tipswithme या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.

















