व्हाईट डिस्चार्ज होत असतांना खाऊ नयेत ५ पदार्थ! त्रास कमी होण्यापेक्षा वाढेल - चुकीचा आहार वाढवतो ही समस्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2026 18:05 IST2026-04-21T18:00:40+5:302026-04-21T18:05:02+5:30

foods to avoid during white discharge : what to avoid eating during white discharge : foods that increase white discharge : रोजच्या आहारातील काही पदार्थ वाढवतात छुपेपणाने व्हाईट डिस्चार्जचा त्रास...

महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपैकी एक महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी समस्या म्हणजे 'व्हाईट डिस्चार्ज' (White Discharge) किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे. नैसर्गिक प्रक्रियेत हे सामान्य असले, तरी जेव्हा याचे प्रमाण वाढते, तेव्हा अशक्तपणा, चिडचिड आणि खाज येण्यासारखे त्रास सुरू होतात.

अनेकदा योग्य आहार न घेतल्यामुळे किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरातील उष्णता वाढते आणि डिस्चार्जची समस्या गंभीर होते. न्यूट्रिशनिस्टच्या मते, केवळ औषधांनी हा त्रास पूर्णपणे बरा होत नाही, तर त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. न्यूट्रिशनिस्ट राजमणी पटेल सांगतात की, आपल्या शरीराचा पीएच (pH) बॅलन्स राखण्यासाठी आहाराची भूमिका मोठी असते. काही विशिष्ट पदार्थ असे असतात की जे व्हाईट डिस्चार्ज जाण्याचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्ज जाणं या समस्येमागे हार्मोन्स, इन्फेक्शन किंवा लाईफस्टाईल मधील बदल कारणीभूत असू शकतात. विशेष म्हणजे, आपल्या आहाराचाही यावर मोठा परिणाम होत असतो. काही पदार्थ असे असतात, जे ही समस्या वाढवू शकतात. त्यामुळे योग्य वेळी आहारात बदल करणं खूप गरजेचं ठरतं. आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ ही समस्या छुपेपणाने वाढवत असतात. नेमके कोणते पदार्थ खाल्ल्याने हा त्रास बळावतो ते पाहूयात.

अननसामध्ये बरेच आम्लयुक्त (Acidic) गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. अननस जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्हाईट डिस्चार्जचे प्रमाण वाढू शकते आणि योनीमार्गात जळजळ किंवा खाज जाणवू शकते. अननस हे उष्ण प्रकृतीचे आणि 'ॲसिडिक' फळ आहे. ज्या महिलांना व्हाईट डिस्चार्जचा त्रास आहे, त्यांनी अननस खाणे टाळलेलेच बरे. कारण यातील आंबटपणामुळे शरीरातील पीएच (pH) पातळी बिघडू शकते, परिणामी डिस्चार्ज आणि त्यासोबत होणारी जळजळ वाढण्याची शक्यता असते.

मशरूम शरीरातील यीस्ट (कँडिडा) वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. यामुळे योनीमार्गातील संसर्ग वाढण्याची शक्यता असते. तसेच, मशरूमची प्रकृती थंड आणि ओलसर असल्याने डिस्चार्ज वाढू शकतो. जर तुम्हाला आधीच यीस्ट इन्फेक्शनचा त्रास असेल, तर मशरूम खाणे टाळलेलेच कधीही उत्तम.

या भाज्यांची प्रकृती थंड असते आणि त्या शरीरातील ओलावा वाढवतात. यामुळे शरीरात सूज येऊ शकते आणि व्हाईट डिस्चार्जचे प्रमाणही वाढू शकते. याशिवाय, कोबी आणि फ्लॉवरमुळे गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्या देखील त्रास देऊ शकते.

लाल भोपळा शरीरातील ओलावा किंवा आर्द्रता वाढवणारा असतो. यामुळे काही महिलांमध्ये पांढरे पाणी जाण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

लवंग हा एक अत्यंत उष्ण मसाला आहे. जर आपल्या नेहमीच्या आहारात लवंग जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्यामुळे योनीमार्गातील नैसर्गिक पीएच (pH) बॅलन्स बिघडू शकतो. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असतो, तसेच योनीमार्गात जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते.

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आहारात दही, ताक यांसारख्या प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा. हे शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यास आणि संसर्ग रोखण्यास मदत करतात. जास्त साखरयुक्त पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा, कारण यामुळे शरीरातील संसर्ग वाढू शकतो. वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. सुती अंतर्वस्त्रे वापरा आणि तो भाग कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा.