तुम्हाला प्रचंड स्ट्रेस आलाय,ओव्हर थिंकिंग करुन डोकं फुटेल-हे सांगणारी ५ लक्षणं, दुर्लक्ष पडेल महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 17:07 IST2026-04-27T16:59:49+5:302026-04-27T17:07:00+5:30

कॉर्टीसॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन. जेव्हा आपण खूप तणावात असतो, मनावर कसला तरी ताण असतो, टेन्शन घेत असतो तेव्हा शरीरातला कॉर्टीसॉल हार्मोन वाढत जातो. तो वाढला की शरीर आपल्याला सूचना देत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करताे.

शरीरावरचा, मनावरचा ताण वाढला की त्यातून वेगवेगळे आजार आपल्याला खूप लवकर गाठतात. तब्येत बिघडत जाते. म्हणूनच वेळीच ही लक्षणं ओळखा आणि मनावरचा ताण लगेचच कमी करण्याचा प्रयत्न करा..

कॉर्टीसॉल वाढल्यानंतर शरीरात काय बदल दिसू लागतात याची माहिती तज्ज्ञांनी dt.dhwaninarania या पेजवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे कॉर्टीसॉल वाढल्यानंतर आर्म फॅट वाढायलाही सुरुवात होते आणि ते स्पष्टपणे वाढलेलं दिसू लागतं.

डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि बारीकशा सुरकुत्या वाढत जाणं हे देखील स्ट्रेस हार्मोन वाढल्याचं एक लक्षण आहे.

केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. तुमचेही केस गळत असतील तर सगळ्यात आधी तुमच्या मनावर काही ताण आहे का ते जाणून घ्या. तो कमी करण्याचा प्रयत्न करा.

कॉर्टीसॉल वाढल्याचा परिणाम आपल्या चयापचय आणि पचन क्रियेवर होतो. या दोन्ही क्रिया बिघडल्या की शरीरात अतिरिक्त चरबी साठण्यास सुरुवात होते. त्यामुळेच पोटावरची चरबी वाढणे, डबल चीन येणे असे त्रासही सुरू होतात.

कॉर्टीसॉल हार्मोन वाढला की साहजिकच त्याचा परिणाम झोपेवर होतो. रात्री शांत झोप होत नाही. अपुऱ्या झोपेमुळे कित्येक त्रास सुरू होतात. शरीरातले हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.