नियमांची एैशी तैशी! फुटबॉल फॅनने आपल्या हॉटनेसने वर्ल्ड कपमध्ये लावली 'आग', फोटो बघून व्हाल बेहाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:31 PM2022-11-26T21:31:20+5:302022-11-26T21:37:11+5:30

Fifa world cup 2022 : कतार हा मुस्लीमबहुल देश असल्यामुळे येथे स्त्रियांसाठी आजही अनेक बंधनं आहेत, मद्यपानाला परवानगी नाही.

सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 चा धुमाकूळ सुरू आहे. पण हा वर्ल्ड कप मॅचेसपेक्षा जास्त काही अजब नियमांमुळे जास्त चर्चेत आहे.

कतारमध्ये फुटबॉल प्रेमींवर काही फारच कठोर नियम लावण्यात आले आहेत. कतार हा मुस्लीमबहुल देश असल्यामुळे येथे स्त्रियांसाठी आजही अनेक बंधनं आहेत, मद्यपानाला परवानगी नाही.

त्यामुळे स्त्रीयांच्या पेहराव्यावरही अनेक निर्बंध आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी आहे. महिला फॅन्सला संपूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घालावे लागत आहेत.

तरीही काही फॅन्स या नियमांचा विरोध करताना दिसत आहे. काहीतर या नियमांचा निषेध करण्यासाठी फारच पुढे आहेत. Ivana Knoll नावाची एक फुटबॉल फॅन तर सध्या खूपच चर्चेत आहे.

कारण तिने कतारमधील सगळे नियम धाब्यांवर बसवून बोल्ड अवतार धारण केला आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. 30 वर्षीय Ivana Croatia ला सपोर्ट करण्यासाठी आली आहे. पण ती सध्या तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आहे.

Ivana ने कतारमधील बंधनं डावलून तिच्या देशाच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी असा बोल्ड ड्रेस परिधान केला आणि त्यामुळे ती सगळ्यांच्या नजरेत आली. सध्या तिची चर्चा सुरू आहे आणि तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिने हे तिचे फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केला आहेत.