नायगाव :येथील ग्रामविकास समिती व लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या विलगीकरण कक्षातुन एकाच दिवसात बावीस रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या बावीस जणांमध्ये एका ८७ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश होता. ...
सिन्नर : उसाच्या शेतात खत टाकत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला गेलेल्या लांडगे कुटुंबीयांवर वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील सायाळे येथे सायंकाळी पाच वाजेच्या ...
वरखेडा : यावर्षी सोयाबीन बियाणांची कमतरता असल्याने बीजप्रक्रिया कशी करावी व घरचे घरी आपल्या बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयीचे दिंडोरी तालुक्यातील खेडगावमध्ये कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले. ...
येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात सध्या द्राक्षबागांची कामे अंतिम टप्प्यात असून, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पेठ, सुरगाणा तालुक्यातील मजूर घराबाहेर पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्षबागेचे वाढीव क्षेत्र असणाऱ्या परिसराला मोठ्या प्रमाणात मजुरां ...
मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्ह ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने वि ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे गावालगत असलेल्या मोबाईल व किराणा दुकानातून चोरी करू पाहणाऱ्या तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६००, कमाल २०२१ रुपये, तर सर्वसाधारण रुपये १५७६ रुपये प्रति क्विंटल राहिले. ...