२४ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. ...
अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. ...
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या खटल्याला अखेर गती मिळाली. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी केदारसह १० आरोपींविरुद्धच्या दोषारोपांवर १ नोव्हेंबरपासून सुनावणी घेण्याचे घोषित केले. ...
उत्तर नागपूर मतदार संघात सकाळी मतदारांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह नव्हता. दुपारपर्यंत असेच चित्र होते. परंतु दुपारनंतर महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. सायंकाळी मतदानाने जोर पकडला. ...
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. वयोवृद्ध, अंध व दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा अधिकार बजावला. ...
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ३.४७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. २०१४च्या निवडणुकीत ५३.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी जवळपास ५०.८० टक्के मतदान झाले आहे. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतदानाचा निरुत्साह दिसून आला व ५.८० टक्क्यांनी मतदान घटले. काही तुरळक ठिकाणी वगळता दक्षिण-पश्चिम मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ...