नागपुरात एमडी तस्करांनी घेतली पाच पोलिसांची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 08:50 PM2019-10-22T20:50:00+5:302019-10-22T22:06:35+5:30

अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले.

MD Police smugglers take five police wickets in Nagpur | नागपुरात एमडी तस्करांनी घेतली पाच पोलिसांची विकेट

नागपुरात एमडी तस्करांनी घेतली पाच पोलिसांची विकेट

Next
ठळक मुद्देअटक आणि पीसीआर : वरिष्ठांनी केले निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडीही मिळवण्यात आली.
चार महिन्यांपासून सलग सणोत्सव आणि निवडणुकीच्या बंदोबस्ताचा ताण घेऊन कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण करणारे हे प्रकरण १९ ऑक्टोबरला चर्चेला आले होते. उपरोक्त आरोपी पोलीस कर्मचारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत (डीबी स्कॉड) कार्यरत होते. १४ ऑक्टोबरला दुपारी ते सर्व नंदनवन परिसरात गस्तीवर असताना त्यांना जमाल शेख नामक अंमली पदार्थाचा तस्कर दिसला. त्याला ताब्यात घेऊन या पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे ३४ ग्राम एमडी पावडर आढळले. यावेळी आरोपी जमाल पळून गेला. तर काही वेळेनंतर जमालचा साथीदार जावेद अली या पोलिसांना रमणा मारोती चौकात भेटला. तेथे जमालचा शोध न घेण्याची मांडवली झाली. त्याबदल्यात जावेदने २ लाख, ४० हजार रुपये पोलिसांच्या हातात कोंबले. या पाचही पोलिसांनी ती रोकड तसेच एमडी पावडर घेऊन मौनीबाबांची भूमिका स्वीकारली. मात्र, पाच दिवसांनंतर पोलिसांच्या मांडवलीचा भंडाफोड झाला. यानंतर एसीपी विजय धोपावकर यांनी १९ ऑक्टोबरला नंदनवन ठाण्यात जाऊन चौकशी केली. हवालदार सचिन एम्प्रेडीवारच्या कपाटाची झडती घेतली असता त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि २ लाख, ४० हजारांची रोकड आढळली. ती जप्त करून सोमवारी सायंकाळी या संबंधाने उपरोक्त पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण एनडीपीएसकडे
या गंभीर प्रकरणात पोलीस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या (एनडीपीएस) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. दरम्यान, वरिष्ठांनी हा तपास एनडीपीएसकडे सोपविला. मंगळवारी या पाचही आरोपींना निलंबित करण्यात आले. या घडामोडीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. यापूर्वी एमडीचा कुख्यात तस्कर आबू याला मदत करण्याच्या आरोपावरून शहर पोलीस दलातील दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले होते, हे विशेष !
मात्र, पाच दिवसांनंतर पोलिसांच्या मांडवलीचा भंडाफोड झाला. यानंतर एसीपी विजय धोपावकर यांनी १९ ऑक्टोबरला नंदनवन ठाण्यात जाऊन चौकशी केली. हवालदार सचिन एम्प्रेडीवारच्या कपाटाची झडती घेतली असता त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि २ लाख, ४० हजारांची रोकड आढळली. ती जप्त करून सोमवारी सायंकाळी या संबंधाने उपरोक्त पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्य आरोपीलाही अटक 
या प्रकरणाचे मूळ असलेला एमडी तस्कर जमाल शेख याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या एनडीपीएसने अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. या सर्वांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्याकडून एमडी तस्करांच्या नव्या नेटवर्कची माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: MD Police smugglers take five police wickets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.