Next

पुण्यातील ABC थंड, गणेशोत्सव मंडळांकडून छापील अहवाल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 11:54 AM2018-09-08T11:54:43+5:302018-09-08T12:01:59+5:30

पुणे - वाढती महागाई आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे गणेशोत्सव मंडळांनी अहवाल छपाईला फाटा दिला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या आधी ...

पुणे - वाढती महागाई आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे गणेशोत्सव मंडळांनी अहवाल छपाईला फाटा दिला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या आधी गजबजणारा अप्पा बळवंत चौक थंडावलेला दिसत आहे. वर्षभर गणेश मंडळाने केलेले विविध उपक्रम, त्यासाठी आलेला खर्च, कार्यकर्त्यांचा गुणगौरव अशा अनेक बाबी मिळून मंडळाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला जात असे. मात्र आता ही परंपरा मागे पडत असून गणेशोत्सव संस्कृतीतला अहवाल न छापण्याकडे किंवा अगदीच मोजके अहवाल प्रसिद्ध करण्यावर मंडळांचा भर आहे.