Next

तेलकट त्वचेचे फायदे पण असतात? Benefits of Oily skin | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:44 PM2021-08-04T14:44:24+5:302021-08-04T14:44:34+5:30

तुमची स्किन खूप Oily आहे का? तुम्हाला सतत तेलकट त्वचा असल्याचा कंटाळा येतो का? मग अजिबात काळजी करू नका.. कारण तेलकट त्वचा असल्याचे खूप फायदे आहेत.. हो! तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय.. तेलकट त्वचेचे फायदे! काही लोकांची त्वचा फारच कोरडी असते तर काही लोकांची त्वचा तेलकट असते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मात्र त्यांच्या त्वचेची फारच चिंता लागलेली असते. पण प्रत्येक प्रकारच्या त्वचेचे काही फायदेही असतात. जे फार कमी लोकांना माहीत असतात. कोरडी त्वचा असेल तर हिवाळ्यात फार जास्त समस्या होता, त्याचप्रमाणे तेलकट त्वचा असलेल्या लोकांना उन्हाळ्यात समस्यांचा सामना करावा लागतो. अशात एक्सपर्ट्स सांगतात की, कोरड्या त्वचेपेक्षा तेलकट त्वचा अधिक फायदेशीर असते. कशी ते जाणून घेऊया