चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:20 IST2026-05-05T11:19:41+5:302026-05-05T11:20:59+5:30

Chinese citizen arrested Jogbani: बिहारच्या जोगबनी चेक पोस्टवर एसएसबी जवानांनी एका चिनी नागरिकाला अटक केली आहे. नेपाळी स्कूटीवरून विना व्हिसा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला.

India Nepal Border Security: A Chinese citizen thought he was smart, entered India with a scooter with a Nepali license plate and... | चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...

चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...

भारत-नेपाळ सीमेवरील जोगबनी एकीकृत चेक पोस्टवर सशस्त्र सीमा दलाच्या जवानांनी एका ४१ वर्षीय चिनी नागरिकाला अटक केली आहे. झोउ हुआन असे या नागरिकाचे नाव असून तो चीनच्या हुनान प्रांतातील रहिवासी आहे. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय नेपाळमार्गे भारतीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एसएसबीच्या ५६ व्या वाहिनीच्या जवानांनी त्याला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, झोउ हुआन नेपाळमधील विराटनगर येथून नेपाळी क्रमांकाच्या स्कूटीवरून जोगबनी चेक पोस्टवर पोहोचला होता. आयसीपी गेटवर तैनात असलेल्या एसएसबी जवानांना त्याच्या हालचालींचा संशय आल्याने त्याला अडवण्यात आले. प्राथमिक तपासात त्याच्याकडे भारत प्रवेशासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध व्हिसा, पासपोर्ट किंवा इतर प्रवासाची कागदपत्रे आढळली नाहीत.

संयुक्त चौकशी सुरू
इमिग्रेशन अधिकारी आणि एसएसबी यांनी केलेल्या संयुक्त चौकशीत त्याने अवैधपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, तो नेपाळमध्ये किती दिवसांपासून होता आणि भारतात येण्यामागचा त्याचा खरा उद्देश काय होता, याचा तपास सर्व यंत्रणांकडून केला जात आहे. एलपीआय व्यवस्थापक रत्नाकर यादव यांनी चिनी नागरिक पकडल्या गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पुढील कायदेशीर कारवाई
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जोगबनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सीमेवरील वाढत्या कारवाया पाहता सुरक्षा यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Web Title : भारत-नेपाल सीमा पर चीनी नागरिक अवैध रूप से प्रवेश करते हुए गिरफ्तार।

Web Summary : एक चीनी नागरिक, झोउ हुआन, को भारत-नेपाल सीमा पर नेपाली स्कूटर के साथ अवैध रूप से भारत में प्रवेश करने की कोशिश करते हुए गिरफ्तार किया गया। उसके पास वैध यात्रा दस्तावेज नहीं थे। नेपाल में उसके रहने की अवधि और मकसद जानने के लिए संयुक्त पूछताछ जारी है, जिसके बाद उसे पुलिस को सौंप दिया जाएगा।

Web Title : Chinese National Arrested at Indo-Nepal Border for Illegal Entry.

Web Summary : A Chinese national, Zhou Huan, was arrested at the Indo-Nepal border for attempting to enter India illegally via Nepal with a Nepali scooter. He lacked valid travel documents. Joint interrogation is underway to determine his motives and duration of stay in Nepal before handing him to police.