तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:31 IST2026-05-05T11:23:32+5:302026-05-05T11:31:49+5:30

Mumbai Crime News: मुंबईतील सायन रुग्णालयातील एक व्हिडीओ बघून अनेकांचा थरकाप उडाला. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात जखमी तरुण रुग्णालयात उभा आणि कोयता त्याच्या डोक्यात अडकलेला आहे. 

Three men attacked, sickle stuck in head; Thrilling video from Sion Hospital, who exactly is that young man? | तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?

तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?

Mumbai Crime Viral Video: गजबज असलेल्या सायन रुग्णालयात शनिवारी एक जखमी व्यक्ती बघून सगळेच हादरले. एक तरुण उभा होता, त्याच्या डोक्यात कोयता अडकलेला होता. उपचारासाठी वाट बघत असलेला तरुण मोबाईल बघत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली. 

व्हिडीओमध्ये जखमी अवस्थेत दिसत असलेल्या तरुणाचे नाव रोहित पवार आहे. २७ वर्षीय रोहित पवारवर तिघांनी हल्ला केला. अल्पवयीन आरोपींनी कोयत्याने वार केला आणि कोयता रोहित पवारच्या डोक्यातच अडकला. तो जखमी अवस्थेतच सायन रुग्णालयात पोहोचला होता. 

सायन रुग्णालयातील व्हिडीओ बघा

जखमी तरुण कुठला, त्याच्यासोबत नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार हा तरुण मानखुर्द येथे राहतो. त्याचा वाद झाला. वाद सुरू असतानाच तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्यावर वार करत असताना कोयत्या रोहित पवारच्या कवटीमध्ये घुसला आणि अडकला. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत तीन विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांना डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

उपचार करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप

हा तरुण सायन रुग्णालयाच्या आयसीयू विभागाबाहेर उभा होता. त्यांच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असतानाही डॉक्टरांकडून विलंब केला जात असल्याचा आरोप करत हा व्हिडीओ बनवण्यात आला होता. ही घटना शनिवारी (२ मे) घडली आहे. 

Web Title : सायन अस्पताल में युवक पर हंसिये से हमला, सिर में फंसा।

Web Summary : रोहित पवार, 27, पर मानखुर्द में तीन नाबालिगों ने हमला किया। एक हंसिया उसके सिर में फंस गया। उसने सायन अस्पताल में इलाज कराया। नाबालिग हिरासत में; इलाज में देरी का आरोप।

Web Title : Youth attacked with sickle, embedded in head, at Sion Hospital.

Web Summary : Rohit Pawar, 27, was attacked by three minors in Mankhurd. A sickle became lodged in his head. He sought treatment at Sion Hospital. The minors are detained; treatment delay alleged.