भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:56 IST2026-05-05T11:54:46+5:302026-05-05T11:56:35+5:30

चीनमधील एका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषण स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

china fireworks factory blast 21 dead xi jinping orders investigation | भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी

फोटो - रॉयटर्स

चीनमधील एका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषण स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

चीनच्या हुनान प्रांतात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं.

'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट सोमवारी संध्याकाळी झाला. या घटनेनंतर चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एका मोठ्या परिसरातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. तिथे इमारती कोसळल्या असून ढिगारा विखुरलेला दिसत आहे. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

रिपोर्टनुसार, हा स्फोट 'हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनी' मध्ये झाला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले असून या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना प्रमुख उद्योगांमधील धोक्यांची तपासणी करणं, आपत्ती निवारण यंत्रणा मजबूत करणं, सार्वजनिक सुरक्षितता वाढवणं आणि लोकांचं जीवन व मालमत्तेचं संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : चीन में पटाखा फैक्ट्री में भीषण विस्फोट, 21 की मौत, 61 घायल

Web Summary : चीन के हुनान प्रांत में एक पटाखा फैक्ट्री में भीषण विस्फोट से 21 लोगों की मौत हो गई और 61 घायल हो गए। राष्ट्रपति शी जिनपिंग ने घटना की गहन जांच के आदेश दिए हैं। विस्फोट सोमवार शाम को हुआ, जिसके बाद आपातकालीन सेवाओं ने तुरंत कार्रवाई की।

Web Title : Massive Explosion at China Fireworks Factory Kills 21, Injures 61

Web Summary : A devastating explosion at a fireworks factory in China's Hunan province has claimed 21 lives and left 61 injured. President Xi Jinping has ordered a thorough investigation into the incident. The blast occurred on Monday evening, prompting a swift response from emergency services.