मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:38 IST2026-05-05T15:38:30+5:302026-05-05T15:38:58+5:30

Shantanu Sinha Biswas Lookout Notice: कोलकाता पोलीस उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास यांच्यावर ईडीची कारवाई. भवानीपूर आणि कालीघाटशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याच्या अडचणी वाढल्या.

Big news! ED became active as soon as Mamata's exit from West Bengal, ED's 'lookout' notice against Kolkata DCP | मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 

मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 

पश्चिम बंगालमधील सत्ता परिवर्तनाच्या धामधुमीत आता प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात 'लुकआउट' नोटीस जारी केली आहे. दक्षिण कोलकात्याच्या बालीगंज भागातील गाजलेल्या 'सोना पप्पू सिंडिकेट' प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...

शांतनु सिन्हा बिस्वास हे यापूर्वी कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. हा परिसर भवानीपूर विधानसभा मतदारसंघात येतो, जिथून ममता बॅनर्जी प्रतिनिधित्व करत होत्या. विशेष म्हणजे, ४ मे रोजी लागलेल्या निकालात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा याच भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला आहे. सत्तेच्या बदलासोबतच आता या हाय-प्रोफाईल पोलीस अधिकाऱ्यांभोवती तपास यंत्रणांचा पाश आवळला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

छापेमारी आणि समन्स:

१९ एप्रिल: पहाटे ७ वाजता ईडीच्या पथकाने बिस्वास यांच्या बालीगंज येथील 'फर्न रोड' वरील घरावर धाड टाकली होती.

२० एप्रिल: ईडीने शांतनु सिन्हा बिस्वास आणि त्यांच्या दोन मुलांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

वारंवार चौकशीला उपस्थित न राहिल्याने किंवा देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरोधात आता 'लुकआउट' नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता देशाबाहेर प्रवास करता येणार नाही आणि विमानतळावर दिसताच त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते.

Web Title : ममता के इस्तीफे के बाद ईडी सक्रिय; कोलकाता डीसीपी के खिलाफ लुकआउट नोटिस

Web Summary : पश्चिम बंगाल में सत्ता परिवर्तन के बाद, ईडी ने कोलकाता डीसीपी शांतनु सिन्हा बिस्वास के खिलाफ मनी लॉन्ड्रिंग मामले में लुकआउट नोटिस जारी किया। वे पहले ममता बनर्जी के निर्वाचन क्षेत्र के प्रभारी थे।

Web Title : ED active after Mamata's exit; Lookout notice against Kolkata DCP.

Web Summary : Following political shifts in West Bengal, ED issued a lookout notice for Kolkata DCP Shantanu Sinha Biswas in connection with a money laundering case. He was previously in charge of a constituency Mamata Banerjee lost.