बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:47 IST2026-05-05T15:47:11+5:302026-05-05T15:47:49+5:30

येत्या ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

West Bengal Assembly Election 2026: Who will be the Chief Minister of West Bengal? Amit shah will take the decision | बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...

बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...

West Bengal Assembly Election 2026 : पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षा (BJP) ने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यामुळे पक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा निर्मय महत्वाचा ठरणार आहे. 

अमित शाहांकडे मोठी जबाबदारी

आता याच पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरन मांझी यांना सह-पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते बंगालमधील बाजपच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावांवर अंतिम निर्णय घेणार आहेत.

जे.पी. नड्डांकडे आसामची जबाबदारी 

पश्चिम बंगालसोबतच आसाममध्येही संघटन मजबूत ठेवण्यासाठी पक्षाने जेपी नड्डा यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सह-पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

९ मे रोजी शपथविधी

बंगालचे भाजपाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी ९ मे रोजी होणार आहे. याचे कारण म्हणजे, याच दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. यामुळेच हा खास दिवस शपथविधीसाठी निवडला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकाल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने २०६ जागांवर विजय मिळवला आहे, तर सत्ताधारी TMC फक्त ८० जागांवर मर्यादित राहिली.

Web Title : बंगाल के मुख्यमंत्री का फैसला भाजपा करेगी; शाह, नड्डा को अहम भूमिकाएँ।

Web Summary : भाजपा ऐतिहासिक जीत के बाद बंगाल के मुख्यमंत्री का फैसला करेगी। अमित शाह चयन की देखरेख करते हैं; नड्डा असम संभालते हैं। शपथ 9 मई को, टैगोर का जन्मदिन होने की संभावना है। भाजपा ने 206 सीटें जीतीं।

Web Title : BJP to decide West Bengal CM; Shah, Nadda get key roles.

Web Summary : BJP will decide West Bengal's CM after a historic win. Amit Shah oversees selection; Nadda handles Assam. The oath is likely May 9, Tagore's birthday. BJP won 206 seats.