Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:52 IST2026-05-05T10:12:22+5:302026-05-05T11:52:35+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
05 May, 26 : 11:51 AM
इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप
इराणने संयुक्त अरब अमिरातीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.
यूएईतील फुजैराहमध्ये इराणने मिसाईल डागली. त्यात तीन भारतीय जखमी झाले. या घटनेबद्दल भारताने तीव्र संताप व्यक्त केला.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले की, "फुजैराहमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. हे अजिबात खपवून घेण्यासारखं नाहीये. हे हल्ले ताबडतोब थांबण्यात यावे आणि सर्वसामान्य लोकांना, तसेच अत्यावश्यक सेवांना लक्ष्य करणे बंद करण्यात यावे."
05 May, 26 : 11:24 AM
आधी विजय यांना भूमिका स्पष्ट करू द्या, मग पाठिंब्याचं ठरवू - सीपीआय
सर्वात आधी विजय यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडू द्या, त्यांच्या भूमिकेनंतर आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. आम्ही DMK आघाडीसोबत आहोत. यात शंका नाही असं विधान सीपीआयचे सचिव पी. षण्मुगम यांनी म्हटलं.
Chennai | Tamil Nadu CPI(M) Secretary P Shanmugam says, "First, let Vijay clearly state his position. Once he does, we will decide whom to support. There is no doubt that we are with the DMK alliance" pic.twitter.com/sG3Y1l6qQN
— ANI (@ANI) May 5, 2026
05 May, 26 : 10:53 AM
पंतप्रधान मोदी आणि विकासावर जनतेने दाखवला विश्वास - श्रीरंग बारणे
जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.
#WATCH | Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata… pic.twitter.com/sWGGTVYYVT
— ANI (@ANI) May 5, 2026
05 May, 26 : 10:29 AM
राघव चड्ढा राष्ट्रपतींच्या भेटीला...
राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते राघव चड्ढा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल
#WATCH | Delhi: Rajya Sabha MP and BJP leader Raghav Chadha reaches Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu. pic.twitter.com/XTISlAVpLi
— ANI (@ANI) May 5, 2026
05 May, 26 : 10:21 AM
नसरापूर प्रकरण: आरोपीच्या मुलगाही संतापला
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. "तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्या", अशी मागणी त्याने केली आहे. त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला