Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:53 IST2026-05-05T11:49:02+5:302026-05-05T11:53:24+5:30

Adhik Maas 2026: यंदा १७ मे पासून अधिक मास सुरु होत आहे, अधिक पुण्य प्राप्तीसाठी मिळणारा हा काळ कोणत्या प्रकारचे दान करून सत्कारणी लावावा ते जाणून घ्या. 

Adhik Maas 2026: A rare yoga after 11 years! Donate these three things for more happiness and prosperity in the month! | Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!

Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!

भारतीय कालगणनेमध्ये 'अधिक मास' ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती अत्यंत शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीयदृष्ट्या रंजक आहे. दर तीन वर्षांनी एकदा येणारा हा महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्यसंचयासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा रविवार, १७ मे २०२६ पासून 'अधिक ज्येष्ठ महिना(Adhik Jyeshtha Maas 2026) सुरू होत असून, या काळात योग्य विधी केल्यास पापांचा नाश होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.

हे ही वाचा : अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!

१. अधिक ज्येष्ठ २०२६: महत्त्वाच्या तारखा

यंदा ज्येष्ठ महिना दोन वेळा येणार आहे. पहिला महिना हा 'अधिक' (वाढीव) असेल आणि दुसरा 'निज' (मूळ) महिना असेल.

अधिक ज्येष्ठ मास: १७ मे २०२६ (रविवार) ते १५ जून २०२६ (सोमवार).

निज ज्येष्ठ मास: १५ जून २०२६ (सोमवार) ते १४ जुलै २०२६ (मंगळवार).

विशेष नोंद: यापूर्वी २०१८ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक आला होता. आता २०२६ नंतर तब्बल ११ वर्षांनी, म्हणजेच २०३७ मध्ये पुन्हा ज्येष्ठ महिना 'अधिक' म्हणून येईल.

हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम

२. अधिक मासातील महत्त्वाचे धार्मिक विधी आणि नियम

अधिक मासाला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात. या काळात खालील गोष्टी करणे अत्यंत फलदायी मानले जाते:

एकभुक्त व्रत आणि मौन भोजन: या महिन्यात एक वेळ जेवून व्रत केले जाते. तसेच, जेवताना मौन पाळल्याने मन शुद्ध होते आणि मानसिक शांती लाभते.

अखंड दीप प्रज्वलन: घरामध्ये अखंड दिवा लावल्याने लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते.

तांबूल दान: अधिक महिन्यात तांबूल (विडा) दान केल्याने सौभाग्य आणि मंगल जीवन प्राप्त होते.

गंगास्नान: पवित्र नद्यांमध्ये किंवा शक्य असल्यास गंगास्नान केल्याने जन्मांतरातील पापांचा निचरा होतो.

हे ही वाचा : अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'

३. अपूपदान (अनारसे दान) आणि त्याचे महत्त्व

अधिक मासात 'अपूपदान' म्हणजेच अनारसे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला, गरजवंताला दिले जाते. 

दानाचे स्वरूप: हे दान ३३ अनारसे, तांबूल आणि दक्षिणा या स्वरूपात असावे.

संकल्प मंत्र: दान करताना खालील मंत्र म्हणावा:

मम त्रयस्त्रिंशद्देवतात्मक-विष्णुरूप-सहस्त्रांशोः
मम पापविनाशाय अपूपदानं गृह्यताम्।

अर्थ : हे प्रभू—तेहतीस कोटी देवतांचे मूर्तिमंत स्वरूप, विष्णूचे प्रकटीकरण आणि सहस्र रूपांनी नटलेले नारायण—माझ्या पापांच्या क्षालनासाठी कृपया ही 'अपूप' (अनारसा) ची अर्पणा स्वीकारा.

दानाचे लाभ: शास्त्रानुसार हे दान केल्याने केवळ धन-संपत्तीच नाही, तर पुत्र, पौत्र आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर, मरणोत्तर मोक्ष प्राप्तीसाठी हे दान अत्यंत प्रभावी मानले जाते.

हे ही वाचा : Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य

४. श्रीविष्णू पूजन: पापांचा नाश आणि सुख-समृद्धी

अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. त्यामुळे या काळात विष्णू उपासनेवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विष्णू सहस्रनाम पठण किंवा विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्याने पितृकृपा प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

थोडक्यात काय, तर दर तीन वर्षांनी येणारी ही संधी साधून, नामस्मरण आणि दानाद्वारे आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही उत्तम वेळ आहे. १७ मे पासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पाच्या उपासनेसोबतच विष्णू चरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्की करा.

Web Title : Adhik Maas 2026: दान से समृद्धि का दुर्लभ अवसर!

Web Summary : 17 मई, 2026 से शुरू होकर, Adhik Maas आध्यात्मिक विकास के लिए शुभ समय है। इस दौरान 'अनारसे' जैसी वस्तुओं का दान और विष्णु पूजा करने से समृद्धि आती है और बाधाएं दूर होती हैं। 11 वर्षों के बाद यह दुर्लभ अवसर भक्ति और दान के माध्यम से जीवन को समृद्ध करने का मौका प्रदान करता है।

Web Title : Adhik Maas 2026: Rare opportunity for prosperity through donation.

Web Summary : Adhik Maas, starting May 17, 2026, is an auspicious time for spiritual growth. Donating items like 'anarase' and engaging in Vishnu worship during this period can bring prosperity and remove obstacles. This rare occurrence after 11 years offers a chance to enrich life through devotion and charity.