अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:11 IST2026-05-04T13:09:19+5:302026-05-04T13:11:04+5:30

Angarak Sankashti Chaturthi 2026: मनावरचे मळभ दूर करण्यासाठी 'हा' गणेश मंत्र तुम्हाला दैनंदिन जीवनात पडेल खूप उपयोगी; अंगारकीच्या मुहूर्तावर करा सुरुवात. 

Angarak Sankashti Chaturthi 2026: Recite 'Ganesh Raksha Mantra' for freedom from fear, depression, and troubles | अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'

अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'

५ मे २०२६ रोजी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी(Angarak Sankashti Chaturthi 2026) ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व प्रकारचे संकट दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी बाप्पाची आराधना करताना 'गणेश रक्षा मंत्राचे' पठण करणे विशेष फलदायी ठरते.

हे ही वाचा : अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!

जीवनात अनेकदा आपल्याला अज्ञात भीती वाटते किंवा महत्त्वाच्या कामात यश मिळेल की नाही याची चिंता सतावते. अशा वेळी गणपती बाप्पाचा 'रक्षा मंत्र' आपल्याला मानसिक बळ आणि संरक्षण देतो.

गणेश रक्षा मंत्र

रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं ।
भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात् ॥

अर्थ: हे गणाध्यक्षा (गणेशा), माझे रक्षण कर! हे त्रिलोकीच्या (तीन लोकांच्या) रक्षका, माझे रक्षण कर! आपण भक्तांना अभय देणारे (निर्भय करणारे) आहात, तरी या संसाररूपी सागरातून (दुःखमय संसारातून) माझे रक्षण कर!

हे ही वाचा : अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा

या मंत्राचे महत्त्व आणि फायदे

संरक्षण: वाईट शक्तींपासून आपले संरक्षण करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे.

भीतीवर विजय: मनातील अनामिक भीती कमी करण्यासाठी या मंत्राचा फायदा होतो.

महत्त्वाच्या कामात यश: परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा कोणतेही महत्त्वाचे काम असेल, त्याआधी वाटणारी भीती दूर करण्यासाठी या मंत्राचे पठण करावे.

हे ही वाचा : Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!

मंत्र पठण करण्याची पद्धत

नित्य पठण: वाईट शक्तींपासून कायमस्वरूपी संरक्षण हवे असेल, तर रोज सकाळी १०८ वेळा या मंत्राचा जप करावा.

कामाच्या वेळी: ऑफिसमधील महत्त्वाची मीटिंग किंवा कोणतेही कठीण काम सुरू करण्यापूर्वी हा मंत्र मनातल्या मनात म्हटल्यास आत्मविश्वास वाढतो.

मनातल्या मनात जप: हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार मनातल्या मनात जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा करू शकता.

Web Title : अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: भय और संकटों से मुक्ति के लिए गणेश रक्षा मंत्र का जाप करें।

Web Summary : अंगारक संकष्टी चतुर्थी (5 मई, 2026) पर भय और बाधाओं से मुक्ति के लिए गणेश रक्षा मंत्र का जाप करें। इस मंत्र का जाप करने से मानसिक शक्ति मिलती है और नकारात्मक ऊर्जाओं से सुरक्षा मिलती है, जिससे महत्वपूर्ण कार्यों में सफलता मिलती है।

Web Title : Angarak Sankashti Chaturthi 2026: Chant Ganesh Raksha Mantra for protection.

Web Summary : Chant the Ganesh Raksha Mantra on Angarak Sankashti Chaturthi (May 5, 2026) for protection from fears and obstacles. Reciting this mantra provides mental strength and safeguards from negative energies, fostering success in important endeavors.