पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:51 IST2026-05-05T15:49:46+5:302026-05-05T15:51:51+5:30

Rajarhat New Town Result 2026 : कोलकाता येथील राजारहाट न्यूटाउन विधानसभा मतदारसंघात मतांची फेरमोजणी सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी निकाल राखून ठेवल्याची माहिती दिली. वाचा सविस्तर अपडेट.

West Bengal Assembly Election Result 2026 : Counting of votes is still underway in one constituency of West Bengal; the results gazettes have not yet reached the Governor... | पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...

पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत असताना, कोलकाता येथील राजारहाट न्यूटाउन या महत्त्वपूर्ण जागेवर मात्र पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात सध्या मतांची फेरमोजणी सुरू असल्याने अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मतमोजणीचा दुसरा दिवस संपत आला तरीही अद्याप राज्याचे निकाल राज्यपालांकडे न पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. 

कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...

मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तापस चॅटर्जी आणि भाजपचे उमेदवार पीयुष कानोडिया यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत मतांमधील अंतर अत्यंत कमी असल्याने, उमेदवारांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने फेरमोजणीचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली की, राजारहाट न्यूटाउनमध्ये फेरमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर केला जाणार नाही. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. फेरमोजणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकालाचा 'गॅझेट' तयार करून तो राज्यपालांकडे पाठवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निकालावर सर्वांच्या नजरा
सुरुवातीच्या कलांनुसार, येथे तृणमूल आणि भाजपमध्ये केवळ ३०० ते ४०० मतांचे अंतर दिसून येत होते. ईव्हीएम मधील मतांच्या आकड्यांवरून निर्माण झालेल्या शंकांनंतर हा फेरमोजणीचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगालमधील इतर सर्व जागांचे निकाल समोर आले असताना, केवळ या एका जागेचा निकाल पेंडिंग असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे.

Web Title : पश्चिम बंगाल: एक निर्वाचन क्षेत्र में पुनर्गणना, राज्यपाल को परिणामों का इंतजार।

Web Summary : राजरहाट न्यूटाउन में पुनर्गणना के कारण पश्चिम बंगाल चुनाव परिणाम में देरी। टीएमसी और भाजपा के बीच कड़ी टक्कर के कारण पुनर्गणना हुई। राज्यपाल को सौंपने से पहले अंतिम राजपत्र प्रक्रिया पूरी होने का इंतजार है। तनाव व्याप्त है।

Web Title : West Bengal Constituency Awaits Recount; Governor Still Without Official Results.

Web Summary : Rajarhat Newtown's vote recount delays West Bengal election results. Close contest between TMC and BJP prompts the recount. Final gazette awaits completion of the process before submission to the Governor. Tension prevails.